मनोरंजन

अमृता फडणवीसांनी घेतले आशा भोसलेंकडून संगीताचे धडे!

आपल्या सुरमधुर आवाजाने गेली आठ दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांना काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. याच धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतंच त्यांची भेट घेऊन काही खास क्षणाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

अमृता फडणवीस यांना समाजसेविका आणि गायिका म्हणून ओळखले जाते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी आशा भोसले यांची भेट घट काही क्षण चित्रबद्ध केले आहेत. दरम्यान इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. यातील एका फोटोत आशा भोसले आणि अमृता फडणवीस छान हसताना दिसत आहेत. तर एका फोटोत त्या दोघीही एकमेकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे.

“मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीतबाबत छान संवादही साधला. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल मार्गदर्शन केले. आता आम्ही पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहोत”, असे कॅप्शन अमृता फडणवीस यांनी दिले आहे.

निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येतं. सन 2021 या वर्षीचा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला. मुंबईत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार आशाताईंना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशाताईंना महाराष्ट्र भूषण हा पुसस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश बहाल करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा:

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओव्दारे होळीच्या हटके शुभेच्छा

Amruta Fadnavis, Asha Bhosle, Amruta Fadnavis took music lessons from Asha Bhosle

Team Lay Bhari

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

15 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

15 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

16 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

16 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

17 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

18 hours ago