30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्राईमअमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमृता फडणवीसांनी अनिक्षा या नावाच्या डिझायनर विरोधात तक्रार दाखल केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. यामध्ये धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने तिच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.

एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्शाने तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन नंबरवरुन पाठवण्यात आले. तसेच डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती. अनिक्षा या डिझायनरसोबत तिच्या वडिलांविरोधात फडणवीस यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम 8 भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्ग वापरण्याशी संबंधित आहे.

या प्रकरणात आता उल्हासनगर येथून आरोपी अक्षीता ही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक बनवण्यात आलं आहे. या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जर या राज्याचे मुख्यमंत्री , गृहमंत्री च सुरक्षित नसतील तर इतर सामान्य जनतेचे काय हाल असतील, याची कल्पना केलेली बरी.

हे सुद्धा वाचा :

अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओव्दारे होळीच्या हटके शुभेच्छा

फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही; ठाकरेंबाबत फडणवीसांचे सूचक विधान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी