28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeएज्युकेशनJobs Update : हवामान खात्यात काम करण्यास इच्छुक आहात? मराठी मुलांसाठी...

Jobs Update : हवामान खात्यात काम करण्यास इच्छुक आहात? मराठी मुलांसाठी मोठी संधी

भारतीय हवामान खात्यात अधिकारी पदांच्या नियुक्तीसाठी मेगी भरती सुरू करण्यात आली असून या पदासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मनासारखी नोकरी मिळावी म्हणून अनेकजण प्रयत्नशील दिसतात, तर कोणी काहीतरी वेगळं करावं म्हणून सुद्धा नोकरीच्या शोधात असल्याचे पाहायला मिळतात आणि अशीच एक संधी सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवामान खात्यात अधिकारी पदांच्या नियुक्तीसाठी मेगी भरती सुरू करण्यात आली असून या पदासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हवामान खात्याचा अंदाज कधीच बरोबर नसतो अशा तक्रारीचा सूर आळवणारे अनेकजण दिसतात पण या न उलगडणाऱ्या प्रश्नांना थेट उत्तरच मिळणार असेल तर, त्यामुळे हे जाणून घेण्यासाठीच ही उत्तम संधी चालून आली आहे असेच म्हणणे आता रास्त ठरणार आहे. https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp येथे सर्व माहिती उपलब्ध आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या खात्यातून 900 जणांना संधी देण्यात येणार असून इतकी पदे सध्या रिक्त आहेत. ही परीक्षा लेखी स्वरूपाची असते. या पदांवर काम केल्यास तुम्हाला उत्तम आणि भरघोस पगार सुद्धा मिळेल. या नोकरीचे स्वरूप All india posting असल्यामुळे देशभरात कुठेही तुम्हाला ती नोकरी करावी लागते मात्र साधारण तीन वर्षांतच सदर व्यक्तीस आपल्या निवडीनुसार चाॅईस स्टेशन मिळते.

हे सुद्धा वाचा…

India GDP : भारताचा GDP आणखी घसरणार, जागतिक बँकेचा चिंता वाढविणारा अंदाज !

Udit Narayan : दिग्गज गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IRCTC : आता फिरण्यासोबत उपचार घेणेही झाले सोपे! जाणून घ्या काय आहे नविन योजना

या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्याचे स्वरुप ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp या वेबसाईला भेट द्यावी लागेल. आवश्यक ती सगळीच माहिती तुम्हाला या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. या पदांसाठी B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स,इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर अर्ज करू शकतात. त्यामुळे या संधीचा मराठी मुलांनी सुद्धा लाभ घ्यायलाच हवा असे सांगण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्यातील अधिकारी वर्गांच्या परीक्षेसाठी कायम दक्षिण व उत्तर भारतातील मुले उत्सुक असल्याचे दिसतात आणि मराठी मुलांमध्ये याबाब कमालीची उदासिनता दिसून येते परंतु हे एक वेगळं क्षेत्र म्हणून मराठी मुलांनी सुद्धा या संधीकडे पाहायला हरकत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी