मनोरंजन

Photo : भाग्यश्री मोटेचा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते होतात फिदा

 

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा भाग्यश्री मोटे हिचा ‘एकदम कडक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल फोटो शुटमुळे नेहमी चर्चेत असते. तीच्या एकदम कडक या चित्रपटाच्या पोस्टरची देखील मोठी चर्चा झाली असून चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘एकदम कडक’ चित्रपटाच्या एका मागोमाग एक एकदम कडक अशा पोस्टर्सने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता मात्र प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाता येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.


या चित्रपटामध्ये भाग्यश्रीने स्वीटीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख यांनी देखील भूमिका साकारली आहे.

भाग्यश्री मोटे हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. मराठीसह दक्षिण भारतीय चित्रपट, हिंदी मालिका, वेबसिरीजमध्ये देखील भाग्यश्री मोटेने भूमिका केल्या आहेत. भाग्यश्री मोटे हिचा जन्म पुण्यात झाला, तर मुंबईतून मास मिडीयामध्ये तिने शिक्षण घेतले आहे. शोधू कुठे या मराठी चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर आगमन केले. शाळा कॉलेजमध्ये असतानाच तिला सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अभिनयाची गोडी लागली.

मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील तिने अभिनय केला आहे. देवों के देव महादेव, जोधा अकबर, सिया के राम अशा पौरानिक मालिकांमध्ये तीने काम केले आहे.

तसेच शोधू कुठे, का रे रास्कला, लय भारी, माझ्या बायकोचा प्रियकर अशा काही चित्रपटांमध्ये तीने काम केले असून आता एकदम कडक या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 

 

टीम लय भारी

Recent Posts

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

24 mins ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

2 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

2 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

3 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

3 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

3 hours ago