मनोरंजन

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

 

बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name) ‘हिम्मतवाला’, ‘मवाली’, ते ‘लाडला ‘,’लम्हे’,’चालबाज’,’चांदनी ‘,’मिस्टर इंडिया’ अशा अनेक चित्रपटांमधून श्रीदेवीने प्रेक्षकांवर आपल्या अदांमधून भुरळ पाडली . अगदी आज त्या हयात नसल्या तरी त्यांची लोकप्रियता हि तितकीच आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. श्रीदेवी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , असं म्हटलं जातं कि बीएमसीनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका  विशिष्ठ चौकाला ‘श्रीदेवी कपूर चौक ‘ असे नाव ठेवले आहे. खरं तर  हि मागणी स्थानिक रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचे नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्वाचा आहे. तो यासाठी, कारण एके काळी श्रीदेवी या तिथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचं पार्थिव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आलं होतं.

हे देखील वाचा

 

काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलत असताना बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यावर उत्तर देत बोनी कपूर म्हणाले होते कि ती एक सेलिब्रिटी असली तरी तिचं हि एक वैयक्तिक, खासगी  आयुष्य होतं आणि त्याप्रमाणेच तिचे आयुष्य हे खासगी असायला हवं. आणि त्यामुळेच जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही.दरम्यान , ‘चमकीला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्रीदेवी यांच्या नावाचीही पुन्हा नव्याने चर्चा करण्यात आली. याचं कारण म्हणजे श्रीदेवी या चमकीलाच्या चाहत्या  होत्या. त्यांनी चमकीलासोबत काम करण्याचा प्रयत्नही केला होता.

हे देखील वाचा

https://laybhari.in/photo-gallery/sai-manjrekar-disco-dansa-photos-look-is-going-viral-on-the-internet/56075/

तसं पाहता हि काही पहिली वेळ नाही कि कोणा कलाकाराच्या नावावर चौकाचं नाव करण्यात येत आहे. या आधी हि अमिताभ बच्चन , राज कपूर यांसारख्या अनेक कलाकारांच्या नावावर मार्गांची, चौकाची नावे ठेवण्यात आली आहेत. सिक्कीम मध्ये असलेल्या एका वॉटरफॉलचं नाव ‘बिग बी’ असं ठेवण्यात आलं आहे. शिवाय सिंगापूरच्या एका आर्किडचं नाव ‘डेंड्रोबिम अमिताभ बच्चन’ असं आहे. कॅनडाच्या एका रस्त्याचं नाव ‘ राज कपूर क्रेसेंट ‘ असे आहे ..

हे ही पहा

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

15 mins ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

39 mins ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

2 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

6 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

6 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

8 hours ago