मनोरंजन

Doctor G Special Screening : आयुष्मान खुराना अभिनित ‘डॉक्टर जी’च्या निर्मात्यांनी आयोजित केली डॉक्टर्ससाठी विशेष स्क्रीनिंग

आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह अभिनित जंगली पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित चित्रपट, ‘डॉक्टर जी’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येते आहे. गमतीशीर आणि अनोख्या पोस्टर्सपासून ते मनोरंजक ट्रेलरपर्यंत, या चित्रपटाने दर्शकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ‘डॉक्टर जी’या चित्रपटात विनोद आणि सामाजिक संदेशासह डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राचे प्रदर्शन असल्याने, अलीकडेच जंगली पिक्चर्सने त्यांच्या कुटुंबियांसमवेत ५० हून अधिक वास्तविक डॉक्टरांसाठी विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.

जंगली पिक्चर्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या चित्रपटाला सर्व डॉक्टरांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद आणि प्रचंड प्रेम पाहायला मिळेल. स्क्रीनिंगदरम्यान, कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीचे आणि चित्रपटात असलेल्या संवेदनशील कथनाचे कौतुक करत डॉक्टरांनी धम्माल केली. उपस्थित डॉक्टरांपैकी एकाने असे सांगितल्याचे दिसून आले की “त्याने त्याच्या आयुष्यातील निवासी दिवस पुन्हा जगले पण मजेदार मार्गाने”. आयुष्मान खुरानासोबत चित्रपटाबद्दल आपले विचार शेअर करताना, एक पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणाला, “तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या निवासी अनुभवाचे चित्रण केले आहे तेच आमच्या बाबतीतही घडले आहे”.

हे सुद्धा वाचा

Shivsena : सेनेचं टेन्शन वाढलं! आमदारांनंतर आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा उमेदवार पळवणार?

T20 World Cup : बुमराह अन् चहरची जागा भरून काढण्यासाठी शामीसह आणखी दोन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार!

Anil Gote : अनिल गोटे म्हणतात, ‘हा’ माणूस फडणवीस, शिंदेंना फाडून खाईल

या चित्रपटाला वैद्यकीय क्षेत्रातून तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शीबा चड्ढा आणि शेफाली शाहचा ट्रेलर आणि डायलॉग प्रोमोसह, या शुक्रवारी चित्रपटाच्या रिलीजसाठी दर्शक सज्ज झाले आहेत. अनुभूती कश्यपद्वारा दिग्दर्शित आणि सुमित सक्सेना, सौरभ भारत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यपद्वारा लिखित ‘डॉक्टर जी’ १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जंगली पिक्चर्सच्या आगामी स्लेटमध्ये ‘वो लड़की है कहां?’, ‘डोसा किंग’, ‘उलज’ आणि ‘क्लिक शंकर’ या नावांचा समावेश आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

15 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

16 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

17 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

17 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

18 hours ago