33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रShivsena : सेनेचं टेन्शन वाढलं! आमदारांनंतर आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा उमेदवार...

Shivsena : सेनेचं टेन्शन वाढलं! आमदारांनंतर आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचा उमेदवार पळवणार?

रमेश लटके यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले होते. अशांतच आता ऋतुजा लटके यांना शिंदे गटात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुत्रांमार्फत समोर आली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अंधेरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या रिक्त जागेवर आमदारपदासाठी होणाऱ्या रपोटनिवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोढवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावावर मशालीच्या चिन्हाखाली लढणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना या नावाखाली ढाल-तलवारीचे चिन्ह घेऊन लढणार आहे. मात्र, त्याआधी उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे.

मुळात उद्धव ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले होते. अशांतच आता ऋतुजा लटके यांना शिंदे गटात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुत्रांमार्फत समोर आली आहे. असा परिस्थितीत ऋतुजा लटके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास उद्धव ठाकरे यांचा उमेदवार फुटेल शिवाय ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या सहानुभुतीच्या राजकारणाला तडा जाण्याची देखील शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरच टांगती तलवार आहे. तरीही दोन्ही गटाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

T20 World Cup : बुमराह अन् चहरची जागा भरून काढण्यासाठी शामीसह आणखी दोन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार!

Anil Gote : अनिल गोटे म्हणतात, ‘हा’ माणूस फडणवीस, शिंदेंना फाडून खाईल

MCA Ellection : मुंबईतल्या निवडणूकीत शरद पवारांचा भाजपला पाठिंबा!

ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. मात्र पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अजूनही त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. ऋुतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकार होत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांची धावाधाव सुरू झालीय.

ऋतुजा लटके यांनी नियमांनुसार निवडणूक लढवण्यासाठी महिन्याभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिलाय. मात्र महापालिका प्रशासनान राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. जोपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरू शकत नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची 14 ऑक्टोबर आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडे शेवटचे 3 दिवस राहिले आहेत.

पोटनिवडणुकीसाठी दुहेरी लढत
या पोटनिवडणुकीसाठी दुहेरी लढत पहायला मिळणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ऋुतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. या व्यतिरिक्त इतर कोणीही अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी या पोटनिवडणुकीत दुहेरी लढत पहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी