मनोरंजन

पुणेकरांचा नाद नाय: ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकरी बांधवांचा ‘टीडीएम’ चित्रपटाला फुल सपोर्ट!

मराठी सिनेमांना प्राईम टाईम नाहीच, मात्र मराठी सिनेमांना किमान मुबलक शो मिळावेत यासाठी आजवर कित्येक चित्रपट निर्मात्यांनी, कलाकारांनी भाष्य केलं आहे. अशातच भरडला गेलेला एक सिनेमा म्हणजे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ हा चित्रपट. दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा ‘टीडीएम’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट प्रेक्षकांसाठी येऊन देखील त्याला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. तरी देखील त्यांच्या चित्रपटाला शो मिळाले नाहीत. त्यामुळे भाऊसाहेब कराडे यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमध्ये शहरातून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी बांधव एकवटल्याचे चित्र यावेळी दिसुन आले.

‘टीडीएम’ हा चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. मात्र, ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करून ते हिंदी चित्रपटांना देण्यात आले. याविरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी सिनेविश्वात पहिल्यांदाच अचंबित करणारी घटना घडली आहे. आता ‘टीडीएम’ चित्रपटाला खुद्द मराठी प्रेक्षकांनी साथ दिली. प्रेक्षकांनी ‘हा चित्रपट पाहायचा आहे’ असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे. ‘टीडीएम’ चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यात सहभाग दर्शवला आहे.

‘मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे’, ‘टीडीएमला प्राईमटाईम शो मिळालेच पाहिजे’, ‘मला ‘टीडीएम’ पाहायचाय मुंबई-पुण्यात कुठेच नाही’ असे नारे लगावत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. एकूणच हे नागरिकांनी, प्रेक्षकांनी केलेलं आंदोलन पाहता त्यांचं ‘टीडीएम’ चित्रपटावरील, भाऊरावांवरील प्रेम, विश्वास याची प्रचिती येते. खेड्यापाड्यातून स्वमेहनतीने स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या या ‘टीडीएम’ चित्रपटाच्या संपूर्ण टीममागे आज शेतकरी बांधव उभा आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

हे सुद्धा वाचा: 

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

The Kerala Storyचा बॉक्स ऑफिसवर धुव्वा; वादग्रस्त ठरूनही करतोय कोटींची कमाई

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

farmers take tractor rally to support TDM marathi movie in pune, TDM, Marathi movie, TDM Marathi movie doesn’t get theater

Team Lay Bhari

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

55 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

1 hour ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

3 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

4 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

6 hours ago