28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनTDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

TDM चित्रपटाला शोज मिळेना! अभिनेता भावूक; अजित पवारांची प्रतिकिया

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची सध्या जबरदस्त चर्चा रंगली आहे. ख्वाडा आणि बबन चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव यांचा नवीन चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र सिनेमाला फार कमी शोज लावण्यात आले आहे. या चित्रपटाला पुरेसे शोज मिळत नसल्याने TDMच्या टीमकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे. एक मराठी चित्रपट पाहण्यासाठी; प्रेक्षकांना मराठी चित्रपटाचे शोज फार कमी मिळणे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. या प्रकरणात आता राजकिय नेत्यांनी उडी घेतली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये स्क्रिन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.

गेल्या काही दिवसात मराठी सिनेमांनी भरारी घेतली आहे. ‘वेड, ‘वाळवी’, ‘झिम्मा’, ‘महाराष्ट्र शाहीर’ सारख्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली. मात्र टीडीएम या चित्रपटाला पुरेसे शोज मिळत नसल्याने टीमकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चित्रपटाचा नवोदित अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. अतिशय कष्टाने सिनेमा बनवून तो दाखवताच येत नाहीए, मराठी सिनेमा संपवला जातोय अशी खंत भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे अजित पवार यांनी ट्विट केले आहे.

मराठी रसिकांना सिनेमा पाहायचा आहे मात्र शोज नसल्याने त्यांना माघारी जावं लागत आहे. सिनेमाच्या टीमने एका थिएटरमध्ये भेट दिली तेव्हा मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरातला अक्षरश: रडू कोसळलं. पृथ्वीराज म्हणाला,”तुम्हीच आपला मराठी सिनेमा मोठा करु शकता. आम्ही एवढ्या मेहनतीने सिनेमा बनवला आहे त्याचं चीज करणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही सिनेमा पाहा आणि मग ठरवा चांगला आहे की वाईट.” हे बोलताना पृथ्वीराज भावूक झाला होता तसंच त्याला रडू कोसळलं. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली. यावेळी सर्व टीमने प्रेक्षकांना हात जोडून चित्रपट पाहण्याची विनंती केली. सर्वांनाच यावेळी अश्रू अनावर झाले होते.

हे सुद्धा वाचा: 

तरूणांनो स्वप्ने पाहा: ऑफिस बॉय ते मेन हीरो; TDM नायकाचा थक्क करणारा प्रवास

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; टीडीएम चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

तब्बल 30 वर्षानंतर माहेरची साडीचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

TDM, Marathi movie, Ajit Pawar, TDM Marathi movie doesn’t get theater; Ajit Pawar tweet

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी