मनोरंजन

टांझानियातही ‘बहरला हा मधुमास’; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा…’ या गाण्याची क्रेझ समाजमाध्यमांवर सर्वत्र पाहायला मिळतेय. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या गाण्यावर रिल्स शेअर करताना दिसत आहेत. अशातच आता या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापार पोहोचल्याचे पाहायला मिळते. टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल याने देखील आपल्या अंदाजात खास व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेता अंकूश चौधरीने प्रतिक्रिया दिली आहे.

टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि त्यांची बहीण निमा पॉल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. विशेषत: आपल्या देशातील हिंदीचं नव्हे तर, मराठी गाण्यांवरही त्यांचं प्रेम अनेकदा पाहायला मिळाले आहे. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर किली आणि निमा दोघेही त्यांच्या पारंपारिक वेशात ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर ताल धरताना दिसले आहेत.

अंकुशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्यांचे कौतुक केले आहे. “मला गाणे आणि डान्स दोन्हीही फार आवडले” असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिने हार्ट इमोजी वापरले आहेत.

शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्ज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरले आहेत. 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आपण आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहू शकता.

हे सुद्धा वाचा: 

ऐकावे ते नवलच! दक्षिणात्य चाहत्याने अभिनेत्री समंथा प्रभूच्या नावाने बांधले मंदिर

पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना इंस्टाग्रामवरील ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

Maharashtra Shaheer, Bahrla Ha Madhumas, Bahrla Ha Madhumas nava song, Maharashtra Shaheer: ‘Bahrla Ha Madhumas’ in Tanzania; Social viral, Ankush Chaudhari, marathi cinema

Team Lay Bhari

Recent Posts

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

17 mins ago

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

2 hours ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

2 hours ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

3 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

4 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

4 hours ago