29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनपोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

पोन्नियन सेल्वन 2 चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

प्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन 2 जगभरात रिलीझ झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. या आधी पोन्नियन सेल्वन 1 ला देखील प्रेकक्षांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियात चित्रपटाची अनेकांनी प्रशंसा केली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. मनिरत्नम यांचा हा अत्यंत महत्त्वकांक्षी असा हा चित्रपट आहे.


तमिळ भाषेतील पोन्नियन सेल्वन या कांदबरीवर आधारीत हा चित्रपट असून हे मोठे शिवधनुष्य मनिरत्नम यांनी अगदी लिलया पेलले असल्याचे हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते. भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक मोठमोठी साम्राज्ये होऊन गेली. मात्र दक्षिण भारताच्या इतिहासाबद्दल तशी कमीच माहिती आज लोकांना आहे. चोल साम्राज्य हे दक्षिण भारतातील एक महान असे साम्राज्य होऊन गेले. या चोल साम्राज्यावर आधारीत पोन्नियन सेल्वन ही प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारीत मनिरत्नम यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला, पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर 28 एप्रिल रोजी चित्रपटाचा दूसरा भाग आज प्रदर्शित झाला आहे.

हे सुद्धा वाचा
बारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी; शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई

हनुमान चालीसा प्रकरण : राणा दाम्पत्याना कोर्टाने फटकारले

बारसू रिफायनरीला कुणबी समाजाचा विरोध

 

पोन्नियन सेल्वन २ मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, कार्ति, जयम रवि, त्रिशा, शोभिता धूलिपाला, ऐश्वर्य लक्ष्मी, शरद कुमार, प्रभु आणि प्रकाश राज अशी मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची पटकथा मनिरत्नम, बी. जयमोहन आणि ई. कुमारवेल यांनी लिहीलेली आहे. तर दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून चित्रपटाचे निर्माता मणिरत्नम आणि सुभाषकरण अलीराजा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी