मनोरंजन

…पण डोळ्यांना ते कधी जमलचं नाही; रिंकू राजगुरुच्या शायरीने चाहते घायाळ

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिचे भारतीय पेहरावातील फोटो आणि टपोरे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालतात. सैराट चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली ‘आर्ची’ तिच्या साडीच्या स्टाईलमुळे देखील प्रसिद्ध आहे.

रिंकू राजगुरुने सोशल मिडीयावर तिचे काळ्या रंगातील दाक्षिनात्य पेहरावातील साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.


रिंकू राजगुरुने फोटोंसोबत ”होठों ने सब बातें छुपा कर रखीं आँखो को ये हुनर कभी आया ही नहीं…” ही शायरी कॅप्शनमध्ये लिहीली आहे. तिच्या या शायरीने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे.

केसात मोगऱ्याचा गजरा, कानात झुमके आणि केसांची बट हलका फुलका मेक-अप केलेला रिंकू चा लुक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर अनेक कमेंट्स केलेल्या आहेत.

 

इस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंना सात  तासांमध्ये जवळपास 45 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक कमेंट्स देखील केलेल्या असून तीचा हा साधा लुक आवडल्याचे देखील म्हटले आहे.

 

रिंकू सोशल मीडियावर अनेकदा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत असते. त्या फोटोंना ती हटके कॅप्शन देखील देते. आजच्या पोस्टमध्ये तीने हिंदीतील प्रसिद्ध गीतकार गुलझार यांच्या ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है’ या गाण्यातील दोन ओळी कॅप्शनमध्ये दिल्या आहेत.

 

रिंकू राजगुरुने नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटानंतर या चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटात तिने भूमिका केली होती. तसेच ओटीटीमाध्यमामावरील काही वेबसिरीजमध्ये दिखील तीने अभिनय केला आहे.

हे सुद्धा वाचा
बीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी
१ कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी; विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढणार
पुराचे पाणी घरात घुसुन नुकसान झालेल्या कुटुंबांना दहा हजारांची नुकसान भरपाई -उपमुख्यमंत्री अजित पवार 

प्रदीप माळी

Recent Posts

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

26 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago