मनोरंजन

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणा-याला जबलपूरमधून अटक

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख हा त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या मन्नत बंगल्यात राहतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते त्याच्या बंगल्याबाहेर जमलेले असतात. नुकतंच शाहरुखचा मन्नत बंगला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यासोबतच मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवून आणू, अशीही धमकी देण्यात आली होती. दरम्यान अखेर ही धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.(SRK Mannat bungalow threatening to blow, Man arrested)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मन्नत बंगला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक केली आहे. जितेश ठाकूर असे या व्यक्तीचे नाव आहे. ६ जानेवारी २०२२ रोजी जितेशने फोन करुन ही धमकी दिली होती.

Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’तील हृतिकचा फर्स्ट लूक रिलीज

KGF Chapter 2 : ‘KGF Chapter 2’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

 नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षात एक अनोळखी व्यक्तीला फोन आला. त्याने शाहरुख खानचा मन्नत बंगला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली. इतकंच नव्हे तर मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवून आणू, अशीही धमकीही दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी तो फोन ट्रेस केला. त्यावेळी हा नंबर मध्य प्रदेशातील जबलपूरचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

याप्रकरणी जबलपूरमधील सीएसपी आलोक शर्मा म्हणाले, “आम्हाला महाराष्ट्र पोलिसांकडून कॉल आला की जबलपूरमधून दहशतवादी हल्ल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी आम्हाला मदतीची गरज आहे. त्यांनी आमची मदत घेतली. आम्ही त्याला शनिवारी ८ जानेवारीला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानचे ‘हे’ चित्रपट आवर्जून पाहाच!

OTTs  melt  Bollywood’s  age  bar  for  women

 जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल खंडेल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांनी एक मोबाईल नंबर शेअर केला होता. ज्याच्या आधारे जितेश ठाकूरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला दारूचे व्यसन असून त्याने यापूर्वीही खोटे कॉल करून पोलिसांच्या एसओएस सेवेच्या डायल १०० या कर्मचाऱ्यांशी भांडण केले होते.

कालच्या फोननंतर अनेक ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असली तरी त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळले नाही. जितेश ठाकूर विरुद्ध धमकावणे आणि सार्वजनिक सेवेला खोटी माहिती देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही खांडेल म्हणाले.

दरम्यान शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये सध्या व्यस्त आहे. लवकरच तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘पठाण’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सलमान खानही दिसणार असल्याचे बोललं जात आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

9 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

9 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

9 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

9 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

9 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

11 hours ago