मनोरंजन

कपिल शर्मासोबत झालेल्या भांडणाबाबत सुनील ग्रोव्हरने केला मोठा खुलासा

कपिल शर्मा आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली नवीन सुरुवात करणार आहे. कपिल शर्मा चा नवीन शो  ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. या शोमध्ये कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची एन्ट्री होणार आहे. (Sunil Grover made a big revelation about the fight with Kapil Sharma) कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात 2017 मध्ये वाद झाला होता. त्यानंतर या दोघांनी सोबत काम नाही केले. मात्र, आता सुनील ग्रोवरने त्या जुन्या वादाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

मुनव्वर फारुकीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

2017 मध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात विमानात भांडण झाले होते. त्यानंतर हे दोघे वेगळे झाले. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर हे दोन्ही कॉमेडियन पुन्हा एकत्र येत आहेत. तसेच, शोच्या एका प्रेस मीटमध्ये कपिल आणि सुनील यांनी त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाबाबत   सांगितले. त्यांनी सांगितले की, ते एक ‘पब्लिसिटी स्टंट’ होते.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरसह कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, किकू शारदा आणि अर्चना पूरण सिंह देखील आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर 30 मार्चपासून रात्री 8 वाजता येणार आहे.(Sunil Grover made a big revelation about the fight with Kapil Sharma)

डेजी शाहला डेट करत आहे शिव ठाकरे? आता स्वतः दिले उत्तर

या इव्हेंटमध्ये सुनील ग्रोव्हर याने सांगितले की, कपिल आणि त्यांनी रिहर्सल करताना खूप वेळ घालवला. हे त्याच्यासाठी घरवापसीसारखे आहे. सुनील पुढे म्हणाला, ‘मी या शोचा एक भाग बनून आनंदी आहे. ही अशी जागा आहे जिथे कामाचे काम वाटत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही दिवसभर हसतो आणि जेव्हा आम्ही स्टेजवर जातो तेव्हा ते हास्य आम्ही तिथे घेऊन जातो. आम्ही नवीन गोष्टी शोधत राहतो. जेव्हाही आम्ही नवीन एपिसोडसाठी रिहर्सल करतो तेव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो. दिवसभर जोक्स बोलण्यात आणि हसण्यात आपल्याला इतकी मजा येते असे मला वाटत नाही.”

जाणून घ्या दीपिकाच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल

पुढे सुनीलने कपिल शर्माने त्यांच्या फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाबद्दल सांगितले. सुनील म्हणाला की, हे त्याचे आणि कपिलचे नाटक होते, जे ते नवीन शोच्या प्रमोशनसाठी तेव्हापासून करत आहेत.  ‘त्यावेळी नेटफ्लिक्स भारतात नवीन होते, त्यामुळे आम्हाला वाटले की टेलिव्हिजन प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी काहीतरी करावे लागेल. त्यामुळे पब्लिसिटी स्टंट म्हणून आम्ही भांडणाची कल्पना सुचली. (Sunil Grover made a big revelation about the fight with Kapil Sharma)

सुनील ग्रोव्हर म्हणाला, ‘आम्ही खूप भाग्यवान आहोत की हा शो जगभरात आणत आहोत. हे सर्व नेटफ्लिक्समुळे घडत आहे. मला बरे वाटत आहे. हा शो प्रेक्षकांना नेहमीच आवडत आला आहे. इतकी वर्षे आपण सगळ्यांना हसवत आहोत. मला आशा आहे की तुमचे प्रेम असेच आम्हाला मिळत राहील.

काजल चोपडे

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

4 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

4 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

5 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

5 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

5 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

6 hours ago