35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनमुनव्वर फारुकीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

मुनव्वर फारुकीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

'बिग बॉस १७' चा (Bigg Boss 17) विनर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीसह १३ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

‘बिग बॉस १७’ चा (Bigg Boss 17) विनर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीसह १३ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.(Munawar Faruqui Detained By Mumbai Police)

मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी मुंबईतील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला होता. यावेळी मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासह अन्य १३ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर फारुकीसह सर्वांना सोडून देण्यात आलं. यानंतर काही वेळातच मुनावर फारुकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुंबई एअरपोर्टवरील फोटो शेअर केले.

याप्रकरणी पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधला. “आमच्या टीमला एका मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही छापेमारी केली. तिथं सापडलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर काही लोकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुनव्वर फारुकीचाही समावेश आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने यावेळी दिली.

डेजी शाहला डेट करत आहे शिव ठाकरे? आता स्वतः दिले उत्तर

छापेमारीनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना सोडून दिलं असलं तरी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. छापेमारीत ४,४०० रुपये रोख आणि १३,५०० रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाणून घ्या दीपिकाच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल

या घटनेनंतर मुनव्वर फारुकीनं आपल्या इंस्टावर मुंबई एअरपोर्टवरील फोटो शेअर केले. तसेच यावेळी त्यांने फोटो शेअर करताना ‘थकलोय तरी प्रवास करतोय’, अशी भावना व्यक्त केली आहे. मात्र, त्याने छापेमारीच्या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेलं नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी