मनोरंजन

सुष्मिताचा ब्रेकअपबाबत मोठा खुलासा

टीम लय भारी

मुंबई: अभिनेत्री सुष्मिता सेननं तिच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच बिनधास्तपणे बोलताना दिसली आहे. २०१८ मध्ये जेव्हा सुष्मितानं स्वतः पेक्षा वयाने लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करायला सुरुवात केली तेव्हाही तिनं आपल्या नात्याबाबत कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती आणि आता रोहमनशी ब्रेकअप झाल्यानंतरही सुष्मितानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही गोष्टही मान्य केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मितानं तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं(Sushmita Sen’s big revelation about breakup ).

या मुलाखतीत सुष्मितानं सांगितलं की, तिला तिच्या प्रत्येक रिलेशनशिपमधून काही ना काही शिकायला मिळालं आहे. ती म्हणाली, ‘माझ्यासाठी कोणतंही नातं संपवणं खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही सेलिब्रेटी असता तेव्हा तुमच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्ती लोकांच्या नजरेत असते. ती व्यक्ती त्या ठिकाणी असते कारण तुम्ही तिला तिच्या सोबत असता. त्यामुळे तुमच्यासाठी आणि त्या व्यक्तीसाठी कोणत्याही एकाच भावनेत गुंतून राहणं आणि हे रिलेशनशिप आहे असा विचार करणं चुकीचं आहे.’

ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट, कॅप्शनची चर्चा

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

सुष्मिता पुढे म्हणाली, ‘एखादं नातं संपवणं दोन्ही व्यक्तींसाठी महत्त्वाचं असतं. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाता येतं आणि हो, मैत्री कायम राहणार आहे. आता या वयात मी जर एका जागी बसून माझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांबद्दल विचार करत राहिले. तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवला आहे.’

याशिवाय सुष्मितानं २०२१ मधील काही खास क्षणांबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं, ‘प्रशंसा प्रत्येक मुलीला आवडते आणि मी याबाबतीत भाग्यवान आहे. माझ्या आयुष्यात प्रशंसेची अजिबात कमतरता नाही. तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहात. माझ्या या प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. या वर्षभरात आयुष्यात बरेच चढ-उतार आले. जसं वर्ष संपत आहे तसं मला अधिकाधिक उत्साही वाटत आहे.’

‘मुघल निर्वासित आहेत’ म्हटल्याबद्दल नसीरुद्दीन शाह मोठ्या प्रमाणात ट्रोल

Sushmita Sen breaks silence on breakup with long-time boyfriend Rohman Shawl

Team Lay Bhari

Recent Posts

भाजपाच्या राजवटीत आदिवासींवर अन्याय,महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाही: प्रियंका गांधी

आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला…

9 mins ago

जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई

नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा…

20 mins ago

छोटा हत्ती गाडी झाली पलटी; बॉक्समधून 7 कोटी रुपये आले बाहेर

आंध्र प्रदेशात आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. काल एनटीआर जिल्ह्यात…

35 mins ago

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘ लाईफ लाईन ‘

क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ' लाईफ लाईन ' ( Life Line) ह्या…

53 mins ago

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj) यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे…

1 hour ago

डॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

लय भारीचा नगर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. या दौ-यादरम्यान मतदार संघातील शेतक-यांशी,…

4 hours ago