35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeसिनेमाAttack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी ‘अटॅक’ (Attack) चित्रपटामुळे चर्चेत आहे. जॉनसोबत जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे(John Abraham’s much awaited movie teaser release)

मोस्ट अवेटेड
रिलीजपूर्वी निर्मात्यांनी मोस्ट अवेटेड असलेल्या या अॅक्शन चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. जॉन या चित्रपटात अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा रेंजर ऑफिसरने हाती घेतलेल्या मिशनवर आधारित आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाला मला गालावर KISS दे…

’83’ Movie | कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर

अॅक्शन आणि ड्रामा

‘अटॅक’ हा अॅक्शन आणि ड्रामा मुव्ही आहे. निर्मात्यांनी 1 मिनिट 23 सेकंदाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरची सुरुवात एका गाण्याने होते, ज्यामध्ये आपण जॉनला एका ढासळलेल्या सैनिकाच्या रूपात पाहतो. त्याला दहशतवादाचा नायनाट करायचा आहे.

टीझरमध्ये जॉन एका किलिंग मशीनच्या भूमिकेत दिसत आहे. जॅकलिनची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. रकुल प्रीत सिंग एक वैज्ञानिकाच्या भूमिकेत असून ती लक्ष वेधून घेते.

कपाळी लालभडक कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदा मुंबईत परतले विकी-कतरीना

John Abraham, Jacqueline Fernandez and Rakul Preet’s action-packed ‘ATTACK’ teaser out – Watch

सुपर सॉलिडरचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा

जॉनने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काल जॉनच्या इन्स्टाग्राम(Instagram)वरून सर्व जुने फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांचे अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र सध्या त्याच्या अकाऊंटवरून चित्रपटाचा टिझर शेअर करून सर्व प्रकारच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. टीझर शेअर करताना जॉनने म्हटले आहे, की भारताच्या पहिल्या सुपर सॉलिडरचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा. याचा टीझर रिलीज झाला आहे. अटॅक 28 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

जानेवारीत प्रदर्शन

जॉनने टीझर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जॉनचा सुपर-कॉप अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटात प्रकाश राज (Prakash Raj) आणि रत्ना पाठक शाह (Ratna Pathak) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट लक्ष्य राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे आणि पेन (PEN)स्टुडिओ, जॉन अब्राहम एन्टरटेनमेंट आणि अजय कपूर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. 28 जानेवारी 2022 रोजी ‘अटॅक’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी