तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयासाठी ओळखला जाणारा वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांच्या साखरपुड्याच्या बातम्या गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहेत. त्याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अखेर या जोडप्याने वरुण तेज यांच्या हैदराबाद येथील आलिशान घरी साखरपुडा केला. या वर्षाअखेरीस हे दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. राम चरण, अल्लू अर्जुन, साई धरम तेज, पंजा वैष्णव तेज आणि अल्लू अरविंद, यासह इतरांनी साखरपुड्याला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.
वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तो चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे. लावण्या त्रिपाठीने 2012 मध्ये आलेल्या ‘अंदला राक्षसी’ या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हे जोडपे 2017 च्या मिस्टर चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि अखेरीस ते प्रेमात पडले.
हे सुध्दा वाचा :
बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, समुद्रात मच्छिमारांनी न जाण्याचा दिला इशारा
विद्यापीठे रँकिंग यादीत येण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंडळाला दिले धडे
रस्त्यावरील 145 मुलां मुलींना मिळणार शिक्षण, फिरत्या पथकाची कामगिरी
वरुण आणि लावण्याच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. वरुण आणि लावण्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…