31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रबिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, समुद्रात मच्छिमारांनी न जाण्याचा दिला इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला, समुद्रात मच्छिमारांनी न जाण्याचा दिला इशारा

भारतात बिपरजॉय चक्रीवादळाचा अत्यंत तीव्र प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान हे वादळ शनिवारी आणखी तीव्र होऊन दोन दिवसांत जवळजवळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील दोन दिवसांत केरळच्या उर्वरित भागांमध्ये आणि दक्षिण द्वीपकल्पातील अतिरिक्त भागात पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 36 तासांमध्ये आणखी हळूहळू तीव्र होईल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

यामुळे सुमारे 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये, असा सर्तकेचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील. तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम गुजरातमध्ये दिसू लागला आहे. गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात हलक्या सरी आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील वलसाडमध्ये समुद्र किनाऱ्यावर जोरदार लाटा उसळत आहेत.

हे सुध्दा वाचा :

चंद्रकांत पाटलांच्या खात्याविरोधात अभाविपने फुंकले रणशिंग !

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे – शरद पवार

पुण्यातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात; आठ लाखांची लाच घेताना पडली धाड

महाराष्ट्र, कर्नाटक,गोवा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात आली आहे. केरळने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोड आणि कन्नूरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, केरळ आणि कर्नाटकातील मच्छिमारांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी