Featured

संकटमोचन मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आज करा ‘हे’ खास उपाय; नक्कीच यश मिळेल

पवनपुत्र हनुमान म्हणा किंवा मारुती नंदन म्हणा, संकटमोचन हनुमान प्रत्येक परिस्थितीत आपल्या भक्तांचे संकट दूर करतात. ६ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सर्व भक्त पूर्ण विधीपूर्वक हनुमानजींची पूजा करतात आणि त्यांची जयंती पूर्ण उत्साहात साजरी करतात.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केले पाहिजेत. असे केल्याने साधकाला सर्व कार्यात यश मिळू शकते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा उपाय केल्यास आणखी जास्त लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया हनुमानजींना प्रसन्न करण्याचे कोणते उपाय आहेत.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मारुती नंदनला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.

जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणत्याही समस्येने घेरले असेल किंवा तुम्हाला कोणतीही भीती वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी 21 वेळा हनुमानजीच्या बजरंग बाणचा पाठ करा.

तुम्ही जे काही काम खूप दिवसांपासून करत आहात आणि त्यात अपयशच येत असेल, तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची विधिवत पूजा करून त्यांना कुंकवाचे लाडू अर्पण करा. या उपायाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागेल.

बजरंबली हे भगवान श्रीरामांचे परम भक्त होते. जो भक्त खऱ्या मनाने मारूतीचे स्मरण करतो त्या भक्तांच्या अडचणी दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात.

हे सुद्धा वाचा : 

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

वर्षातून दोनदा साजरा केला जातो ‘हनुमान जन्मोत्सव’; जाणून घ्या कारण

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगाची कृपा सदैव राहण्यासाठी करा ‘हे’ खास उपाय

 

Hanuman Jayanti upay : You will definitely get success in work

Team Lay Bhari

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

43 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

7 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago