35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeपाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम
Array

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

कराचीमध्ये पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर आहे, ज्याचा इतिहास रामायणाशी संबंधित आहे. मूठभर माती हटवल्यानंतर पाकिस्तानात ही मूर्ती सापडली. आजही भाविक मनोभावे 11 परिक्रमा करतात आणि यामागचे रहस्य कायम आहे.

अविभाजित भारतातील एक हनुमान मंदिर फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या भागात गेला. कराची शहरात असलेले हे पंचमुखी हनुमानाचे मंदिर अतिशय चमत्कारिक मानले जाते. हे मंदिर वेगळे आणि अद्वितीय आहे. कराचीतील या हनुमान मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिरातील पंचमुखी हनुमानाची मूर्ती हजारो वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.

प्रभू रामानेही या ठिकाणी एकदा भेट दिल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. या ऐतिहासिक मंदिरात हनुमानजींच्या दर्शनासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची गर्दी असते. या मंदिराचा आणि 11 क्रमांकाचा खोल संबंध आहे. हे मंदिर असलेल्या ठिकाणाहून 11 मूठभर माती काढल्यानंतर ही पंचमुखी हनुमान मूर्ती प्रकट झाल्याचे मानले जाते. या मंदिरात हनुमानाच्या 11 परिक्रमा केल्याने भक्तांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

वैदिक मान्यतेनुसार, हे मंदिर अनेक लाखों वर्षे जुने आहे, परंतु सध्याच्या मंदिराचा इतिहास 18 व्या शतकाशी संबंधित आहे. दरम्यान 1882 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

पंचमुखी हनुमान मंदिराभोवती भेट देण्याची ठिकाणे

1. स्वामीनारायण मंदिर – कराचीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्वामीनारायण नावाचे मंदिर आहे.

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

2. माता मंदिर – कराचीतील हनुमान मंदिरापासून काही अंतरावर मां कालीचे मंदिर आहे.

पाकिस्तानातही पंचमुखी हनुमानाचे चमत्कारिक मंदिर; 11 परिक्रमांचे रहस्य कायम

हे सुद्धा वाचा : वर्षातून दोनदा साजरा केला जातो ‘हनुमान जन्मोत्सव’; जाणून घ्या कारण

हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगाची कृपा सदैव राहण्यासाठी करा ‘हे’ खास उपाय

श्रीराम नवमी 2023: श्रीराम जन्मोत्सवाच्या ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या..

Hanuman Jayanti 2023, Panchmukhi Hanuman Temple in Pakistan

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी