Featured

रियल हीरोज: सागरदूत हर्षद करतोय ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत पर्यावरणाचं रक्षण !

सागरदूत म्हणून नावारूपाला आलेला हर्षद ढगे त्याच्या ‘फॉर फ्यूचर इंडिया‘ या संस्थेमार्फत पर्यावरणाचं रक्षण करण्याची जनजागृती करत आहे. समुद्रात होणारे प्रदुषण मानवा बरोबर मस्त्य जीवावर उठले आहे. दररोज पाण्यात टाकला जाणारा कचरा भरती बरोबर मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर जमा होत असून तो उचलण्यासाठी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने कंबर कसली. स्वच्छतेचा वसा घेताना त्याने फॉर फ्युचर इंडिया या संस्थेची स्थापना केली. आता पर्यंत किनाऱ्यावर शेकडो वेळा सर्व प्रकरचा कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचा विडा या सागरदूताने उचलला आहे. त्याच्या या महायज्ञात आज असंख्य मुलांबरोबर नागरिक अगदी उत्स्फूर्त पणे सहभागी होऊ लागले आहेत.

विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात द्वितीय वर्षात वाणिज्य शाखेत शिकत असताना हर्षद ढगे याने 1 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी फॉर फ्युचर इंडिया या संस्थेची मुहूर्त मेढ रोवली. मित्रांबरोबर समुद्र किनाऱ्याची सैर करत असताना तेथील बकाल परिस्थिती मन अस्वस्थ करणारी होती. या पृथ्वीवर आपण जन्म घेतला त्याचे काहीतरी देणे लागतो या हेतूने प्रेरित झालेल्या हर्षद ढगे याने वसुंधरा वाचविण्याच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलला. संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला त्याला सुरुवाती पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम चार ते पाच मित्रांच्या सोबतीने स्वखर्चाने सुरू केलेल्या समुद्र किनाऱ्याच्या साफसफाई मोहिमेत आज तब्बल 300 ते 400 लोक दर आठवड्याच्या शनिवारी, रविवारी ठरलेल्या ठिकाणी जमा होत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून संस्थेने  25,000 हून अधिक स्वयंसेवकांसोबत लाखो लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. समुद्रकिनारे आणि खारफुटी परिसरातून 1200 टनपेक्षा जास्त प्लास्टिक व मिश्रित कचरा गोळा करण्यात यश मिळवले. फक्त कचरा गोळा न करता त्यावर Recycle प्रक्रिया करण्याचासुद्धा प्रयत्न सुरु आहे.

सुरुवातीला सांताक्रुझ येथील जुहू त्यानंतर मिरा भाईंदर मधील उतन, वेलांकनी, तर मुंबई मधील गोराई, मनोरी या समुद्रकिनाऱ्यावर तर भाईंदर पूर्व खाडी, भाईंदर पश्चिम, गोराई खाडी, मानोरी खाडी येथे कांदळवन स्वच्छतेचे मिशन सुरूच आहे. आजूबाजूच्या नाला, गटारामधून येणारा कचरा समुद्रातच जमा होतो. लाकडी देव्हारे, प्लास्टिक चपल, काचा, गाध्या अशा विघटन न होणाऱ्या वस्तूही यात असतात. खारफुटी मध्ये या अडकून पडत असल्यामुळे त्यांच्या वाढीवरही परिणाम होत असून समुद्री जीवांचा अधीवासही नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. हर्षद ढगे याच्या मिशनमुळे किनारे चकाचक होऊ लागले असून मुंबई व मिरा भाईंदर महानगरपालिकेने त्याच्या सामाजिक उपक्रमात साथ देत कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्वीकारली. शिवाय महापालिकेने समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी डस्टबिनची सोय केलीच. शिवाय सूचना फलक लावत नियम मोडणाऱ्या विरोधात दंडाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच हर्षद ढगे यांच्या पाठपुरवठ्याला साथ देत नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्त व किनारा स्वच्छेतेसाठी आधुनिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यासोबतच हर्षद ढगे आणि फॉर फ्युचर इंडियाने 3000 हून अधिक झाडे लावली आहेत. ऑक्सिजनची गरज जाणून स्थानिकांना फायदा व्हावा म्हणून अनेक झाडे लावली. FFI ने ‘जंजिरे धारावी किल्ला’ वर “गोडबंदर किल्ला’ येथे  स्वच्छता उपक्रम” देखील राबविला आहे. ट्रेकिंग व्यतिरिक्त, हर्षद ढगे याने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता उपक्रम राबवले आहेत. प्रशासनाशी पत्रव्यवहार करून खारफुटीमध्ये टाकलेला डेब्रिज हटवून पुनर्वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सागरी जंगलाचे संवर्धन होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा: 

पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरू केला चहाचा ब्रॅंड

प्रेरणादायी: हमाल ते IAS अधिकारी; रेल्वेच्या फ्री वायफायवरून अभ्यास करणाऱ्या श्रीनाथची कहाणी वाचा

अविश्वसनीय! पुस्तक प्रकाशित करणारा 4 वर्षांचा चिमुकला ठरला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी

प्रत्येक साप्ताहिक स्वच्छता मोहिमेनंतर आणि गेल्या 3 वर्षांपासून अनेक जागरुकता कार्यक्रमांनंतर समुद्रकिनारे आणि खारफुटीच्या परिसरात बदल दिसून येत आहेत.

1) प्रत्येकासाठी सहज समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी अनेक क्लीनअप टूल्स आणले गेले.

२) बर्‍याच जनजागृती मोहिमेनंतर, स्थानिक लोकांनी बीच परिसरात कचरा फेकणे बंद केले आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही प्लास्टिक वापरणे बंद केले.

3) जनजागृतीसाठी “या किनाऱ्यावर प्लास्टिक टाकू नये” असे अनेक फलक समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळाले.

4) आमच्या स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीच्या वेळी, आमच्या साफसफाईमध्ये मदत करण्यासाठी महानगपालिकेचा एकही व्यक्ती (स्वच्छता कर्मचारी) नव्हता परंतु नंतर अनेक पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला या कामात मदत करण्यासाठी महानगपालिकेचे स्वच्छता पथक नेमण्यात आले. हर्षद ढगे व फॉर फ्युचर इंडियामुळे रोजगार निर्माण झाला.

5) महानगपालिकेसोबत अनेक कागदोपत्री काम केल्यानंतर, आम्हाला क्लीनअप कॉम्पॅक्टर मशीन, ट्रॅक्टर, जेसीबी, ट्रॅक्टर-टोव्ड बीच क्लिनर यांसारख्या अनेक मशिनरी उपलब्ध झाल्या.

Real Heroes: Harshad Dhage protect the environment through For Future India

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

59 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago