35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनअविश्वसनीय! पुस्तक प्रकाशित करणारा 4 वर्षांचा चिमुकला ठरला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी

अविश्वसनीय! पुस्तक प्रकाशित करणारा 4 वर्षांचा चिमुकला ठरला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, अबु धाबीचा सईद रशीद अल म्हैरी हे 4 वर्षे 218 दिवस वयात पुस्तक प्रकाशित करणारे जगातील सर्वात लहान/तरुण व्यक्ती आहेत. सईदने त्याच्या मोठ्या बहिणीकडून पुस्तकासाठी प्रेरणा घेतली.

लहान मूले खूप संवेदनशील आणि हुशार असतात. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ते निरीक्षण करून त्यानुसार वागण्याचा-बोलण्याचा प्रयत्न करतात. शाळेत जाणाऱ्या लहाणग्यांनी खूप शिकावे-मोठे व्हावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची मापक अपेक्षा असते. मात्र लहान वयातच पुस्तक लिहून प्रकाशन करणाऱ्या चिमूकल्याने जगासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. आबूधाबीतील सईद रशीद अल म्हैरी याने वयाच्या चौथ्या वर्षी पुस्तक प्रकाशन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब जिंकला आहे. त्यामुळे वय हा यशाचा अडथळा मुळीच असू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, संयुक्त अरब अमिरातील सईद रशीद हा 4 वर्षे 218 दिवस वयात पुस्तक प्रकाशित करणार जगातील सर्वात लहान/तरुण व्यक्ती आहेत. सईदने त्याच्या मोठ्या बहिणीकडून पुस्तकासाठी प्रेरणा घेतली. यश मिळवण्यात प्रतिभा कशी मदत करू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून, संयुक्त अरब अमिरातीतील एका चार वर्षांच्या मुलाने पुस्तक प्रकाशित करणारा सर्वात तरुण व्यक्ती (पुरुष) बनण्याचे सर्व विक्रम मोडीत काढले. चिमुकल्या सईद चे ‘द एलिफंट सईद आणि द बीअर’ या पुस्तकाचे तब्बल 1,000 प्रती विकल्यानंतर 9 मार्च 2023 रोजी त्याच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यात आली. या पुस्तकात प्रेम, दयाळूपणा आणि दोन प्राण्यांमधील अनपेक्षित मैत्रीची कथा लिहिली गेली आहे.

विशेषतः 4 वर्षांच्या सईदची मार्गदर्शक त्यांची 8 वर्षांची मोठी बहीण अलधाबी आहे. अलधाबीने स्वतः बहुभाषिक पुस्तक मालिका (महिला) प्रकाशित करून, लेखन करणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून नावलौकिक केलं आहे. “माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत खेळण्यात आनंद वाटतो. आम्ही एकत्र वाचतो, लिहितो, चित्र काढतो आणि इतर अनेक गोष्टी करतो. मला वाटले की, मी माझे पुस्तक [तिच्याकडून प्रेरित होऊन] लिहिले,” सईदने सांगितले.

“हे [पुस्तक] हत्ती सईद आणि ध्रुवीय अस्वल बद्दल आहे. हत्तीची सहल होती आणि त्याला ध्रुवीय अस्वल दिसले. त्याला वाटले अस्वल त्याला खाणारं आहे पण शेवटी, हत्तीने दया दाखवली आणि म्हटले, ‘चला एकत्र पिकनिक करू’! मग ते मित्र बनले आणि एकमेकांवर दया दाखवली,” सईद पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा: 

Guinness World Records: अक्षय कुमारने सेल्फी खेचतं केला नवा विश्वविक्रम; ३ मिनिटांत चक्क क्लिक केल्या एवढ्या सेल्फीज्

Guinness World Records : महाराष्ट्रातील ‘हा’ पक्षीप्रेमी आहे जगातील सर्वात मोठा बर्ड फीडर..!

एव्हेंजर्स’चे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत ‘स्पायडरमॅन’ ठरला बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर

4 year old youngest boy publish a book sets guinness world record

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी