33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनपुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरू केला चहाचा ब्रॅंड

पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्याने सुरू केला चहाचा ब्रॅंड

उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच आदित्य सातपुतेने स्वत:ची ओळख निर्माण केली. मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून आदित्यने जवळपास 25 हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. पण आता आदित्य सातपुते व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने ‘कॅफे टी डे’ नावाचा चहाचा ब्रॅंड नुकताच लॉंच केला आहे. तसेच ‘अ सीप फिल्ड वीथ डिलाइट’ अशी या ब्रॅंडची टॅग लाइन आहे. या ब्रॅंडचे उद्घाटन पुण्यात संपन्न झाले असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात या ब्रॅंडच्या दहा फ्रॅंचाइसी एकत्र सुरू होणार आहेत.

आत्तापर्यंत अभिनेता आदित्य सातपुतेने हुरपरी, ट्रिंग ट्रिंग, फक्त बायको पाहिजे, लयं गुणाची हाय, रूप साजरं असे जवळपास 25 हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट झाले आहेत. त्याचा स्वतःचा A/7 स्टुडिओ नावाचा कपड्यांचा ब्रॅंड देखिल आहे. आदित्यचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adv. Aditya Satpute (@aditya7pute)

नव्या कॅफे टी डे या चहाच्या ब्रॅंडविषयी आदित्य सांगतो, “खरंतर मला विश्वासच बसत नाही आहे. परंतु मला लहानपणापासूनच काहीतरी नविन सुूरू करायच होत. आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतं आहे. नविन उद्योजकांना एक संधी मिळावी हे या ब्रॅंडचं उद्दीष्ट आहे. नविन तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. माझी पत्नी नेहा सातपुते ही या ब्रॅंडची मॅनेजींग डायरेक्टर असेल. आपल्या महाराष्ट्रातील महिलांना एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने हा ब्रॅंड प्रयत्न करेल. एस ॲन्ड एसचे संस्थापक मनोज सांगळे आणि दिग्दर्शक रोहित जाधव यांनी या ब्रॅंडसाठी मला साथ दिली. मी माझ्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे आभार मानतो. आणि तरूणांना आव्हान करतो की त्यांनी सुद्धा व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचं धाडसं करावं.”

हे सुद्धा वाचा : 

तरूणांनो स्वप्ने पाहा: ऑफिस बॉय ते मेन हीरो; TDM नायकाचा थक्क करणारा प्रवास

मॅगीनंतर आता अंडयावर प्रयोग: वेफर ऑमलेटची रेसिपी पाहून खवय्ये संतापले; सोशल व्हायरल

तब्बल 30 वर्षानंतर माहेरची साडी प्रेक्षकांच्या भेटीला

Aditya Satpute, Cafe Tea Day, Marathi actor Aditya Satpute started a Cafe Tea Day tea brand

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी