आरोग्य

जाणून घ्या, कोरफडीमध्ये दडलेलं रहस्य

उन्हाळ्याच्या (summer season) दिवसांत सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होण्याचा धोका असतो. कडक उन्हाचा त्वचेवर खुप परिणाम होतो. उन्हाळ्यात त्वचा निस्तेज आणि निर्जिव होते. अशा परिस्थितीत त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोरफड जेलचा (Aloevera) वापर करा. यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते. कोरफड (Aloevera) अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. सनबर्न, मुरुम, खाज आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. (aloe vera benefits for skin)

कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध वनस्पती आहे, जी व्हिटॅमिन A, C, E, फॉलिक ॲसिड, कोलीन, बी 1, बी 2, बी 3 आणि बी 6 व्हिटॅमिन बी 12 सारखे अनेक गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत. उन्हाळ्यात रोज रात्री कोरफड जेलने चेहऱ्याला मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार होते. यासोबतच त्वचा घट्ट होण्यासही मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम दूर करण्यास मदत होते. इतकंच नाही तर त्वचेतील कोलेजन वाढवण्यासही मदत होते.

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहऱ्यावर थोडं कोरफड जेल लावा. हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते. यासोबतच त्वचेवरील पुरळांपासूनही तुम्हाला संरक्षण मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्यात तुमची त्वचा थंड राहते, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर रॅश येणार नाही.

अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.

चहा, कॉफी नाही… तर सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ 3 गोष्टींचे सेवन, रोगांपासून रहा दूर

कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

धनश्री ओतारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago