आरोग्य

रमेश सांगळे यांच्या ‘आजचा दिवस फक्त’ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार

आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस तरुणाई व्यवसनांच्या आहारी जात आहे, अशा या काळात व्यसनमुक्तीसाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रमेश सांगळे यांनी आपले जीवन व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेतले आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या ‘आजचा दिवस फक्त’ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास मराठा मंदिर साहित्य शाखेच्या वतीने नवोदित लेखकांसाठी घेण्यात आलेल्या साहित्य लेखन पुस्तक प्रकाशन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मराठा मंदिर सभागृहात पार पडला.

या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राज्यसभा खासदार पद्मश्री कुमार केतकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲड. शशिकांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, चिटणीस राजेंद्र गावडे उपस्थित होते. उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचा सन्मान कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या पुरस्काराबाबत रमेश सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला माझी दिवंगत पत्नी नंदा हिच्याकडून मिळाली. हा पुरस्कार मी तिला सन्मानपूर्वक बहाल करीत आहे. तसेच आगामी काळात व्यसनांच्या संदर्भातच पुस्तक लिखाण करणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिका आणि वृत्तपत्र लेखिका मंदाकिनी भट यांनी केले. मराठा मंदिर साहित्य शाखेचे खजिनदार संतोष घाग यांच्या हस्ते रमेश सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पोलीस भरतीचे अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन; धनंजय मुंडे, राजेंद्र पातोडे यांची अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

Kirit Somayya : किरीट सोमय्या स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल!

आज तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थांच्या अंमलाखाली तरुणाई गेली आहे. त्यामुळे कुटुंबावर देखील त्याचे मोठे परिनाम होत आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या व्यसनाधीनचे प्रमाण कमी व्हावे, तरुणांईला व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी, त्यांचे प्रबोधन करण्यासाठी रमेश सांगळे सांगळे आहोरात्र झटत आहेत. त्यांच्या व्यसनमुक्तीवरील स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या लिहिलेल्या ‘आजचा दिवस फक्त’ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकाला मराठा मंदिर साहित्य शाखेच्या वतीने नवोदित लेखकांसाठी घेण्यात आलेल्या साहित्य लेखन, पुस्तक प्रकाशन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल सांगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

3 mins ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

14 mins ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

25 mins ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

2 hours ago

भाजपाच्या राजवटीत आदिवासींवर अन्याय,महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाही: प्रियंका गांधी

आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आदिवासी समाजाला…

2 hours ago

जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई

नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा…

2 hours ago