आरोग्य

भूमि पेडणेकरच्या थँक्यू फॉर कमिंग चित्रपटात मांडलेल्या ऑरगॅजम विषयाबाबत तुम्हाला माहिती आहे का?

अभिनेत्री भूमि पेडणेकरचा थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला असून युट्यबवर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे. जवळपास 6 कोटींहून अधिक व्ह्यूज या ट्रेलरला मिळाले आहेत. महिलांच्या ऑरगॅजमवर (कामतृप्ती) हा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे सेक्स्युअल लाईफवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेकांना ऑरगॅजमबद्दल माहिती नसते, किंवा त्याबद्दल बोलायचे नसते. पण हा चित्रपटानिमित्त हा विषय चर्चेत आला आहे. तुम्हाला या लेखातून ऑरगॅजमबद्दल माहिती वाचायला मिळेल.

सेक्स्यूअल लाईफमध्ये ऑरगॅजमला अत्यंत महत्त्व आहे. पण नेमके त्याच बाबतील अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने निराशा येते. आपल्याकडे पुरुष सेक्सचा आनंद घेतात, मात्र आपला जोडीदाराला आपण सुख देऊ शकलो का? याचा विचार फारसा केला जात नाही. त्यामुळे दोघांनाही ऑरगॅजमबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

तर ऑरगॅजम म्हणजे थोडक्यात परमोच्च सुख. आपल्या जोडीदाराला आनंद मिळवून देण्यासाठी काय करायला हवे याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या समाजात अनेक महिलांना ऑरगॅजम मिळवून देणयात पुरुषांना स्वारस्य नसते, किंवा त्यांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. तसेच महिलांना देखील त्याबद्दल खुल्यापणाने बोलता येत नाही, किंवा त्या आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे अनेक जोडीदारांच्या लैंगिक आयुष्यात ते खुश नसतात.

अनेक सेक्सॉलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार असे समोर आले आहे की, पार्टनरला ऑरगॅजम न मिळवून दिल्यामुळे अनेकजण कामजीवनातील खरा आनंद मिळवू शकत नाहीत. त्याबद्दल बोलत देखील नाहीत, परिनामी त्यांच्या कामजीवनातील समस्यांवर ते विचारच करु शकत नाहीत. त्या सुटण्या ऐवजी गुंता वाढतच जातो.

आपल्या जोडीदाराला परमोच्च आनंद मिळवून द्यायचा असेल तर त्यांनी त्यांचे लैंगिक जीवन सुदृढ, निरोगी ठेवणे आवष्यक आहे. कामजीवनात सर्वोच्च सुख मिळविण्यासाठी लैंगिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला पाहिजे. तसेच कामजीवनाबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. पुरुषांनी आपले आरोग्य जपणे आवश्यक असून कामजीवनावर विपरीत परिनाम करतील अशा सवयी सोडल्या पाहिजेत. तसेच अनेक महिला, मुलींना सेक्सबद्दल दडपण असते. त्याच्यात लैंगिक इच्छांचा देखील अभाव असतो. अशा समस्या असल्यास डॉक्टरांशी बोलून त्यावर समाधान मिळविणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा 
भूमि पेडणेकरचा फिमेल ऑर्गजमवर भाष्य करणारा थँक्यू फॉर कमिंग; युट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरचा 1.6 कोटी व्ह्यूज
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बनावट पनीरचा धंदा तेजीत!
साखरपुढ्याला लगबगीने सगळे आले, आता वऱ्हाडी म्हणून कोण कोण येणार परिणीती-राघव चढ्ढाच्या लग्नाला ?
सेक्स्यूअल लाईफमध्ये अनेकदा स्त्री आणि पुरुषांमध्ये देखील कमी माहिती असते. त्यामुळे अधिक वेळा सेक्स करणे, जास्तवेळ सेक्स केल्याने कामोत्तेजना मिळते असे त्यांना वाटते. मात्र अधिक वेळा आणि जास्त वेळ सेक्स करुन देखील कामतृप्ती मिळेलच असे नसते. त्यामुळे जर कामजीवनात आनंद मिळत नसेल तर जोडीदारासोबत बोलून, प्रसंगी डॉक्टर, मानसोपचार तज्ञांशी बोलून समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

9 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

10 hours ago