आरोग्य

सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे माहित आहे का?

टीम लय भारी

बाजारात हिवाळ्याच्या दिवसात सीताफळ खूप असतात. हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या या फळामध्ये खूप साऱ्या बिया असतात. सीताफळाचा सुगंध खूप छान असतो. काही जणांना सीताफळात बिया जास्त असल्यामुळे खायला कंटाळा येतो. मात्र पिकलेले सीताफळ खाण्याची मज्जा काही औरच असते. सीताफळाचे बरेच आरोग्यादायी फायदे आहेत. सीताफळात भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. जसे सीताफळाचे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहेत. त्यामुळे सीताफळ खाण्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत? ते जाणून घ्या.. (custard apple is healthy for our health )

सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे माहित आहे का?

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

सीताफळाचे फायदे..

  • सीताफळमध्ये अनेक अँटीऑक्सीडेंट असतात. एसिमिसीन आणि बुलाटासिस नावाचे अँटीऑक्सीडेंट सीताफळमध्ये असून हे कँन्सर विरोधी गुणधर्म आहेत. हे अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला प्रदूषणास लढण्यास मदत करतात.
  • एक सीताफळ खाल्ल्यामुळे दररोज १० टक्के पोटॅशिअम आणि ६ टक्के मॅग्निशिअमची गरज पूर्ण होते. हे दोन्ही रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात. तसेच सीताफळ हदयरोगापासून संरक्षण करते.
  • सीतफळ फायबरसाठी चांगला स्रोत आहे. यामध्ये सोल्यूएबल आणि इनसोल्यूएबल दोन्ही फायबर असतात जे पचन करण्यात मदत करतात. बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांसाठी सीताफळ हे एक चांगले फळ आहे.

सीताफळाचे तोटे…

  • सीताफळामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले, तर सूज येऊ शकते. तसेच फायबर जास्त असल्यामुळे जुलाब होऊ शकतात, ज्यामुळे उलट्या देखील होऊ शकतात.
  • सीताफळाच्या बिया विषारी असतात, ज्या त्वचा आणि डोळ्यांसाठी वाईट असतात. अभ्यासानुसार, सीताफळाच्या बियांची पावडर वापरल्यामुळे त्वचेवर वेदना होणे आणि त्वचा लालसर होऊ शकतो. तसेच यामुळे गंभीर डोळ्यांची समस्या होऊ शकते.
  • सीताफळमध्ये खूप कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तसेच यात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त सीताफळ खाऊ नका. मधुमेह रुग्णांनी हे फळ खाऊ नका, कारण सीताफळामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
  • जर तुम्ही आधीपासून कोणतेही औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळत आहे; ओवेसींचा मोदींवर निशाणा !

Why you must add sharifa or custard apple to your diet this season

 

Mruga Vartak

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

7 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

7 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago