30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

टीम लय भारी

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांद्वारे कारवाई करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Devendra Fadnavis will be reversed on him, Chhagan Bhujbal’s warning to BJP)

भाजप राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा अतिरेकी वापर करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

प्रदेश काँग्रेसमध्ये नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार अस्थिर करण्याचा डाव सुरु आहे. मात्र हा डाव त्यांच्यावरच उलटेल असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. तसेच भाजप केवळ यंत्रणांच्या जोरावर आपले सरकार बनवू शकत नाही असेही छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय यंत्रणांच्या अतिरेकी वापरावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. चंद्रपुर दौऱ्यादरम्यान भुजबळांनी विरोधी पक्षेनते देवेंद्र फडणवीसांना सूचक इशारा दिला आहे. केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम करत आहे. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु केवळ यंत्रणांच्या बळावर भाजप आपले सरकार बनवू शकत नाही असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांद्वारे कारवाई करुन भाजपची प्रतिमा उंचवणार आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे असा दावाही भुजबळांनी केला.

ओबीसी आरक्षणासाठी एकत्र येण्याची गरज

ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. त्यांच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करा. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे. न्यायालयीन लढाई देखील राज्याची सुरू आहे.

न्यायालयाला हवा असलेला इंम्पेरिकल डाटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो डाटा केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. आज अनेक जण इतिहासाची मोडतोड करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उभे केले जात आहेत मात्र जनतेने यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन छगन भुजबळांनी केलं आहे.

संतापजनक: ‘तो’ व्हिडीओ पतीला दाखवेल अशी धमकी देत आतेभावाचा बहिणीवर अत्याचार

Shiv Sena slams BJP: Devendra Fadnavis & BJP netas accused of using ED & CBI

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी