आरोग्य

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ करणार तुमचे सर्दी, खोकल्यापासून संरक्षण

टीम लय भारी

थंडीच्या दिवसांत असे काही पदार्थ तुमचा सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करु शकतात. या पदार्थांच्या सेवनामुळे तुम्ही थंडीतही फिट अँड फाईन राहू शकता. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण करता येते. जाणून घेऊ नेमके हे पदार्थ कोणते आहेत(Foods in winter will protect you from cold and cough )

संत्री

थंडीच्या दिवसांत शरीराला व्हिटॉमिन्स आणि अँटीऑक्सीडेंट्स संत्रेतून मिळते. त्यामुळे थंडीत संत्री खाणे फायदेशीर मानले जाते. तसचे जिभेची चव टिकून राहावी यासाठीही संत्रं खायला हवे.

OnePlus 10 Pro लाँच होणार, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?

एव्हेंजर्स’चे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत ‘स्पायडरमॅन’ ठरला बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर

संत्र खाण्याचे तसेच अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते, पोटातील गॅस कमी होतो, किडनी स्टोनच्या आजारापासून संरक्षण मिळते, रक्तदाब नियंत्रणात राहते. याशिवाय शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्य़ासाठी संत्रे खाणे अतिशय चांगले मानले जाते.

मसाले चहा

 लवंग आणि दालचिनी घातलेला मसाले चहा थंडीच्या दिवसांत तुम्हाला खूप फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शिवाय थकवा, मरगळ दूर होण्यास मदत होते. मसाले चहातील लवंग शरीराच्या वेदना कमी करण्यास खूप प्रभावी आहे. सर्दीपासून बचाव करण्यास मसाले चहा फायदेशीर आहे.

मुलींचं लग्नाचं वय २१ करण्यावरून नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा

Seasonal eating for winter nutrition

लसूण

 भरपूर प्रमाणात पोषण तत्व असणारे लसूण खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे दिसून येतील. लसणात अँटी इंफ्लामेट्री आणि मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे थंडीच्या दिवसांत तुम्हाला व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहता येते. लसूण रोगप्रतकारशक्ती वाढवते. शिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्य़ास मदत होते. डायबेटिसच्या रुग्णांसाठीही लसूण फायदेशीर असते.

हळद

 थंडीच्या दिवसात दूधात हळद टाकून पिल्याने खूप फायदा होतो. कारण हळदीत कॅल्शिअम, आर्यन, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरची मात्रा असते. यामुळे शरीरातील अनेक समस्यांना तोंड देण्यास मदत करतात. यामुळे अन्न पचण्यास देखील मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

मध

 थंडीच्या दिवसात मध शरीरासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. मध आणि आल्याचा रस करुन पिल्यास घशातील खवखव कमी होते. तसेच खोकल्यापासून बचाव करता येतो.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

13 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago