32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमुलींचं लग्नाचं वय २१ करण्यावरून नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा

मुलींचं लग्नाचं वय २१ करण्यावरून नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा

टीम लय भारी

मुंबई: मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंदर्भात केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. (Nawab Malik targets Modi government)

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, अविवाहित लोकांच्या हातात हा देश आहे, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत तसेच महिलांचे वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाणार का, असा सवाल  करत जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. असे तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करत आहे का, अशी खोचक विचारणा करत, हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

Nawab Malik : PM मोदीनी स्वतः लस घेऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी

नवाब मलिकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीची आवश्यकता : प्रवीण दरेकर

नवाब मलिक यांनी स्त्री-पुरुषांच्या वयामध्ये लग्नासाठी अंतर असायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे. “मला वाटत नाही की असं काही करण्याचा निर्णय झाला आहे. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केलं जातं. लग्नासाठी महिलांचं वय २१ झालं, तर मग पुरुषांचं वय २५ केलं जाईल का? पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर असायला हवं”, असं नवाब मलिक म्हणाले.

जनतेला काय हवे, ते महत्त्वाचे आहे. अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केले जाते. पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर असायला हवे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

फडणवीस शाळेत जात होते तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते; मलिकांचा टोला

Public Should Know Truth About Anti-Drugs Officer: Maharashtra Minister

“आम्हाला वाटतं की जनतेला काय हवंय ते महत्त्वाचं आहे. अविवाहीत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटतं, हे महत्त्वाचं नाही. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा”, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुलींचं लग्नाचं वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर यासंदर्भातलं विधेयक यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा निर्णय देखील झाल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सनं मुलींचं लग्नाचं वय १८ वरून २१ करण्याची शिफारस केली आहे. या अहवालानंतर मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी