आरोग्य

Solapur News : ‘राष्ट्रीय फोरेन्स नाईटिंगल पुरस्कार 2021’वर सोलापूरच्या लेकीने कोरले नाव

आरोग्य खात्यात अविरतपणे सेवा निभावणाऱ्या परिचारिका मनिषा जाधव यांना यंदाचा ‘राष्ट्रीय फोरेन्स नाईटिंगल पुरस्कार 2021’ जाहीर झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जाधव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या या लेकीच्या कौतुकाची चर्चा संपुर्ण देशभरात रंगलेली पाहायला मिळत आहे. आरोग्य सेवेतील उल्लेखनिय काम केल्याबद्दल मनिषा जाधव यांना राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याची प्रथमच आरोग्य विभागातून राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराची निवड करण्यात आली त्यामुळे सगळीकडून केवळ कौतुकाचा वर्षाव पाहायला मिळत आहे.

फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे 1810 हा जन्मदिवस. संपुर्ण आयुष्यच त्यांनी आरोग्य परिचारीका म्हणून त्यांनी आरोग्य सेवेसाठी प्रदान केली, त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ 12 मे हा त्यांचा जन्मदिवस संपुर्ण जगभरात जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत भारत सरकार दरवर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस फ्लोरेन्स नाइटिंगेल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करते.

हे सुद्धा वाचा…

Abdul Sattar : कृषी मंत्री अब्दुल सत्तार बरळले; सुप्रिया सुळे यांना म्हणाले भिकार****

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra News : भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्याचा भीषण अपघात

आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरी पाहून मनिषा जाधव यांना यंदाचा फ्लोरेन्स नाइटिंगेल 2021 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम 50 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामिण भागातून शिक्षण घेतलेल्या मनिषा जाधव यांची आरोग्य सेवेतील उत्तुंग कामगिरी आणि त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली नोंद केवळ सोलापूर जिल्ह्याची नव्हे तर संपुर्ण राज्याची मान गर्वाने उंचावणारी आहे.

मनिषा जाधव यांनी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये तालुका पातळीवर कुटुंब-नियोजन शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. याच कामाची पोचपावती म्हणून सलग दोन्ही वर्षी प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यावेळचे सोलापूर जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर 2017 मध्ये “जननी-सुरक्षा योजना” शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत होत्या त्याचा पहिला क्रमांक आला. त्याबद्दल सुद्धा त्यांना त्यावेळी तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई यांचे मार्फत दिला जाणारा “आदर्श परिचारिका” हा पुरस्कार सुद्धा त्यांना बहाल करण्यात आला. त्यानंतर मनिषा जाधव फ्लोरेन्स नाइटिंगेल 2021 या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या असून थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनच कौतुकाची थाप मिळाली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जाधव यांचे खूप कौतुक केले आहे.

यावेळी बोलताना स्वामी म्हणाले, जाधव यांना देशपातळीवरच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. जाधव यांच्या कामामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा देशपातळीवर सन्मान झाला आहे असे म्हणून दिलीप स्वामी यांनी तोंडभरून मनीषा जाधव यांचे कौतुक केले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी देखील जाधव यांचे कौतुक केले आहे.

या पुरस्कारावर बोलताना डॉ. शितलकुमार जाधव म्हणतात, सोलापूर जिल्हा आरोग्य विभागासाठी जाधव यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मला याचा आनंद आहे. जाधव यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे, असे म्हणून जाधव यांनी मनिषा जाधव यांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

1 hour ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago