29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रNagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Nagpur Rape Case : स्कूल व्हॅन चालकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

स्कुल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत वारंवार त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नागपूर शहरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्कुल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत वारंवार त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना कोराडी पोलिस (Koradi Police) ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणातील आरोपी व्हॅन चालक पवन काहपरे (वय 26, रा. नांदा) याच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चालक काहपरे याच्यावर पोस्को (POSCO) आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, नागपुरातील बलात्काराच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर स्कुल व्हॅन चालक पवन हा खापरखेडा येथील नांदा येथील रहिवासी आहे. पीडिता 15 वर्षीय विद्यार्थीनी असून ती आरोपीच्या व्हॅनमधून शाळेत जात असे. या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 12 ऑक्टोबर रोजी पवनने अत्याचार केला. त्या दिवशी आरोपी पवनने पीडित विद्यार्थीनीला शाळेत नेण्यासाठी बसवले परंतु तिला शाळेत नेण्याऐवजी कोराडी येथे फिरायला जाण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर जोरजबरस्ती करत अत्याचार केला. केवळ इतक्यावरच न थांबता त्याने याचा एक व्हिडिओ सुद्धा तयार केला.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra News : भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्याचा भीषण अपघात

Navneet Rana : ‘नवनीत राणांवर कारवाई का होत नाही?’ न्यायालयाने पोलिसांना झापले

Virat Kohli : ‘किंग इज बॅक’ उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोहली बनलाय जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

आरोपी पवनची विद्यार्थिनीच्या नातेवाईकांमध्ये चांगलीत ओळख होती, त्यामुळे हा व्हिडिओ शूट झाल्याचे कळताच विद्यार्थिनी प्रचंड घाबरून गेली. दरम्यान, या व्हिडिओच्या मदतीने पवनने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरू केले आणि यातून तो तिच्याकडे पुन्हा पुन्हा शरीरसुखाची मागणी करू लागला. पवनकडे व्हिडिओ असल्यामुळे विद्यार्थिनीवर तो दबाव टाकू लागला होता, यामध्ये त्या विद्यार्थिनीला सुद्धा ठोसपणे काहीच करता येत नव्हते. मुलीचे वय लहान असल्याने या संपुर्ण प्रकारांत ती घाबरून गेली होती.

मुलीच्या वागणुकीतील बदल कुटुंबियांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने बोलणे टाळले, मात्र ज्यावेळी मुलीच्या मोबाईलवरील आक्षेपार्ह एसएमएस पाहिले त्यावेळी तिला विश्वासात घेऊन शांतपणे नेमकं काय चाललंय याबाबत विचारणा केली, त्यावेळी मात्र विद्यार्थिनीने तिच्याबाबत घडलेला सगळाच प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी थेट कोराडी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुद्धा वेगाने तपासाची चक्र फिरवत आरोपी पवनवर पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. यावेळी आरोपी पवन विवाहित असल्याते तपासातून निष्पन्न झाले, त्यामुळे आणखी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी