नोकरी

भारतीय आयटी कंपन्यांचे कॅम्पस हायरिंग 40 टक्क्यांनी घटणार!

भारतीय आयटी कंपन्याचे कॅम्पस हायरिंग 40 टक्क्यांनी घटणार आहे. यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असली तरी वाढती स्पर्धा, जागतिक मंदीची स्थिती आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे त्याचे मुख्य कारण असू शकते. फ्रेशर्स दर्जाची दुय्यम कामे करण्यास एआय तंत्रज्ञान सक्षम झाले असून कंपन्या हा नवा पर्याय निवडताना दिसत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस खालावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टेक जॉब मार्केट सध्या अत्यंत स्पर्धात्मक आहे. अनेक बड्या कंपन्या खर्च कमी करण्यासाठी अधिकाधिक कर्मचारी काढून टाकत आहेत. स्टार्टअप असो, की मध्यम आकाराची फर्म किंवा मायक्रोसॉफ्ट, गुगल सारखी महाकाय कॉर्पोरेशन असो, सर्वांनीच ले-ऑफ म्हणजेच कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. त्यातच आता टीमलीज डिजिटल रिक्रूटमेंट फर्मने केलेल्या विश्लेषणानुसार, भारतीय आयटी कंपन्या 2024 च्या आर्थिक वर्षात फ्रेशर्सची नियुक्ती 40 टक्क्यांनी कमी करू शकतात.

 

‘लाइव्हमिंट’च्या अहवालानुसार, भारतीय आयटी कंपन्यांनी 2023 मध्ये तब्बल 2,30,000 विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नियुक्ती दिली होती. मात्र, 2024 मध्ये कॅम्पस मुलाखतीतून फक्त 1,55,000 विद्यार्थ्यांना संधी दिली जाणे अपेक्षित आहे. दरम्यान, भारतातील सर्वात मोठ्या कॅम्पस नियोक्तांपैकी एक असलेली विप्रो कंपनी यंदा कॅम्पसमध्ये जाणार नाही. यापूर्वी दिल्या गेलेल्या आणि प्रलंबित ऑफरवरील उमेदवारांना प्राथमिकता देण्याचे कंपनीचे धोरण असल्याचे विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी सांगितले.

एका वर्षापूर्वी असलेल्या स्थितीपेक्षा आजची स्थिती वेगळी आहे. मागणी खालावत आहे. त्यामुळे नोकरी देण्याची शर्यत कमी होत चालली आहे. खालवणारा अ‍ॅट्रिशन दर त्यातच आर्थिक अनिश्चिततेमुळे कंपन्यांचे दृष्टिकोन बदलले आहेत.

 

यंदा फेब्रुवारीत विप्रोने फ्रेशर्सच्या जॉब ऑफरमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मोठे काहूर माजले होते. मोठा गदारोळ उठला होता. माध्यमांनी त्यांच्या ठळक हेडलाईन्स केल्या होत्या. कॉलेज विश्वातही त्यामुळे खळबळ माजली होती. विप्रोने सुरुवातीला फ्रेशर्सना 6.5 लाख रुपयांचे सॅलरी पॅकेज ऑफर केले होते. मात्र, आता ‘बदलणारे मॅक्रो वातावरण’ हे कारण सांगून कंपनी फ्रेशर्सच्या पॅकेजमध्ये बदल करत आहे.

विप्रोच्या या निर्णयामुळे कंपनीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तथापि, अहवालानुसार कंपनीने ऑफर स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना सक्ती न करता त्यांची ऑफर कायम ठेवून कमी पॅकेज ऑफरसह तयार असलेल्या उमेदवारांना संधी दिली. 92 टक्के फ्रेशर्सनी लवकर नियुक्ती मिळावी म्हणून, प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी कमी पगाराच्या ऑफरवर कंपनीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे विप्रोचे मुख्य वित्तीय अधिकारी, जतिन दलाल यांनी स्पष्ट केले.

 

हे सुद्धा वाचा : 

आयटी इंजिनियर तरुणी आई-भावासह बेंगळुरू दर्शन सहलीला निघाली अन् जीवच गमावून बसली !

अमेरिकेत राहण्यासाठी हजारो भारतीय आयटी कामगार करताहेत रोजगार संघर्ष

आर्थिक मंदीचा फेरा, IIT ची प्लेसमेंट संकटात !

“फ्रेशर्सबाबतचे निर्णय पूर्ण निष्पक्षतेने आणि पारदर्शकतेने घेतले जातात. नेक्स्ट-जेन असोसिएट्सना दोन्ही पर्याय दिले गेले. कॅम्पसमधील 92 टक्के विद्यार्थ्यांनी मूळ ऑफरवर नंतर विप्रोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आम्ही नेक्स्ट-जनरेशन असोसिएट्सच्या आधारावर नवी भारती करणे सुरू ठेवू. आमच्या व्यवसायासाठी वर्षभर नव्या उमेदवारांची गरज आहे. ऑफर स्वीकारून रुजू न होणाऱ्या व मूळ ऑफर पॅकेजवरच रुजू होण्यासाठी आग्रही असलेल्या उमेदवारांना नंतर जागा उपलब्ध होतील तेव्हा गरजेनुसार संधी दिली जाईल. तूर्तास बदललेल्या परिस्थितीत कमी पॅकेजवर तात्काळ रुजू होणाऱ्यांना कंपनी सामावून घेत आहे,” असे विप्रोचे सीएफओ जतिन दलाल यांनी म्हटले आहे.

विप्रोच्या पावलावर पाऊल ठेवून इतर कंपन्याही विद्यार्थ्यांना कमी पगाराच्या ऑफरवर रुजू होण्यास सांगू शकतात.

Campus Hiring, Indian IT Companies, IT Companies, Wipro Offer Way, Campus Interview
विक्रांत पाटील

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

21 mins ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

2 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

3 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

4 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

4 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

4 hours ago