नोकरी

मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांची १७ वर्षांनंतर समस्या मार्गी, आमदार संजय केळकर यांचा मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा

टीम लय भारी

ठाणे: मध्य वैतरणा प्रकल्पातील (Middle Vaitarna Dam) प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा आणि नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची नोकरीत सामावून घेण्याची आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा आणि झाडीचा मोबदला मिळण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचा आणि नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.(After 17 years, the problem of Madhya Vaitarna project victims has been solved)

मध्य वैतरणा प्रकल्पातील (Middle Vaitarna Dam) मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावाच्या आदिवासी प्रकल्पग्रस्तांना  नुकसान भरपाई आणि नोकरीत सामावून घेण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने १० मार्च २०२२ रोजी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. बेल्हारे यांच्या दालनात आमदार संजय केळकर आणि प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत बैठक झाली.

याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होऊन प्रथम नोकरीस पात्र असतील अशा प्रकल्पग्रस्तांना(Middle Vaitarna Dam) नोकरी देण्यात यावी आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांना आवश्यक आणि प्रचलित कायद्याच्या आधारे आर्थिक निकसं भरपाई देण्यात यावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त श्री. बेल्हारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून

मध्य वैतरणा प्रकल्पात(Middle Vaitarna Dam) येथील आदिवासींची जमीन आणि वडिलोपार्जित शेती संपादित केली गेली आहे. त्यातील अनेकांना मोबदला मिळाला, परंतु १९ प्रकल्पग्रस्तांना मोबादलमिळलेला नाही. गेल्या १७ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची नोकरीत सामावून घेण्याची आणि बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा आणि झाडीचा मोबदला मिळण्याची मागणी तसेच २००५ ते २०२१ या काळात शेती न झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून प्रतिवर्षी एक लाख रुपये कृषी मंजुरीसाठी मागणी आहे. तत्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सूचनाही श्री. बेल्हारे यांनी बैठकीत दिल्या.

गेले अनेक वर्षे या प्रकरणी जिल्हा स्तरापासून मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. मात्र आमदार संजय केळकर यांनी आमची व्यथा समजून घेऊन  मुंबई महापालिका आयुक्तांकडे मांडल्या आणि तत्काळ कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. आमदार संजय केळकर  आम्हाला न्याय मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. या बैठकीत आमदार संजय केळकर अतिरिक्त आयुक्त श्री. बेल्हारे, महापालिका अधिकारी श्री. गायकवाड तसेच प्रकल्पग्रस्तांचे (Middle Vaitarna Dam) प्रतिनिधी श्री. ठोंबरे, श्री. काथोड आदी उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा :

Middle Vaitarna power plant to save the BMC Rs 25-crore

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

Jyoti Khot

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

7 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

8 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

8 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

9 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

9 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

11 hours ago