नोकरी

सरकारी भरती : उद्योग निरीक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. (Recruitment Industry Inspector) एमपीएससी मार्फत या क वर्ग पदासाठी 2021 भरतीची मुख्य परीक्षा नुकतीच घेतली गेली होती.

राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या उद्योग संचालनालयाच्या अखत्यारीत हे पद येते. या पदासाठी सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. गट क संवर्गातील हे सरकारी पद आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही तात्पुरती निवड यादी आहे. या यादीच्या आधारे उमेदवार संबंधित भरती प्रक्रियेतून बाहेर पडू शकतात, म्हणजे ऑप्ट आऊट होऊ शकतात. त्यासाठीही आयोगाने विकल्प मागविले आहेत.

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आऊट विकल्पाचा वापर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. त्यासाठी, https://mpsc.gov.in या आयोगाच्या वेबसाइटवर जावे. मेनूवर जाऊन ‘ऑनलाईन फॅसिलिटी’ला क्लिक करावे. त्यात पोस्ट प्रेफरन्स या अंतर्गत ऑप्टिंग आऊट साठी वेबलिंक आहे. 20 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत ही वेबलिंक ॲक्टिव्ह राहील.

हेही वाचा : 

उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी लागत नाही; कन्हैया कुमार यांची भाजपवर टीका

गरीबीवर मात करत मुलगी बनली क्लास वन ऑफिसर

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 1000 हून अधिक शिक्षकांची भरती करणार

या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यात म्हणजे ऑप्टिंग आऊटमध्ये उमेदवारांना काही तांत्रिक अडचण आल्यास, 7303821822 किंवा 18001234275 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय, ई-मेलद्वारे support-online@mpsc.gov.in या आयडीवर सहा दिवसांच्या मुदतीत संपर्क साधता येईल. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने ही माहिती कळविली आहे.

Recruitment Industry Inspector, Udyog Nirikshak Bharti Result Declared , MPSC Results 2022
टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

4 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

5 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

5 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

6 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

6 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

10 hours ago