महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का; त्या प्रकरणाचा निकाल आला; बायकोचं पदही गेलं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST Co-operative Bank) वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्तेंवर ओढावली आहे, तसंच सदावर्ते दाम्पत्याचं (wife’s position was also lost) संचालक पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्याने घेतला आहे, त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याप्रकरणी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.(A big blow to Gunaratna Sadavarte; The case was decided; The wife’s position was also lost.)

सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अवहालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं. अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं, पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही. तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलवून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती.

बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीररित्या करण्याचा ठराव आणला, तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे यापुढे सदावर्ते पती-पत्नींना स्वीकृत संचालक म्हणून राहता येणार नाही. एसटी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यसत्व देण्याचा ठरावही नामंजूर केला गेला, अशी माहिती संदीप शिंदे यांनी दिली आहे.बँकेत बेकायदेशीररित्या कर्मचारी भरती सुरू आहे, या भरतीलाही सहकार खात्याने स्थगिती दिली आहे, पण असं असतानाही भरती सुरू आहे, असा आरोपही संदीप शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणाचीही तक्रार करण्यात आल्याचं संदीप शिंदे म्हणाले आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

2 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

3 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

4 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

6 hours ago