महाराष्ट्र

MLA Kailas Patil Fasting: ठाकरे गटाच्या आमदाराला आम आदमी पक्षाचा पाठींबा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आजपासून उपोषण

राज्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कालच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत म्हणून शिवसेना (ठाकरे गट) सध्या आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून आज ठाकरे गटाचे (Thackeray Group) उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी त्यांना नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. या उपोषणाला आम आदमी पक्षाने आपला पाठींबा जाहीर केला आहे.

आमदार कैलास पाटील यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, अनुदान आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे राज्य समिती सदस्य अॅड. अजित खोत, तुळजाभवानी ज्येष्ठ नागरी संघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी भेट घेऊन आंदोलनास पाठींबा दर्शविला.

हे सुद्धा वाचा

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे १९९९ मध्ये मुख्यमंत्री होणार होते, पण शिवसेनेने…

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही वेळी फटाके वाजणार? शिंदे गटाचे आमदार नाराज?

आमदार कैलास पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील 2020 च्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत यापेक्षा कोणतेही दुर्देव नाही. यंदा अतिवृष्टी, खोड किडी, चक्री भुंगा यासारख्या रोगामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या जाचक निकषांमुळे अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं असताना मी दिवाळी कशी साजरी करू असे म्हणत आमदार कैलास पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या सोबत खासदार ओमराजे निंबाळकर देखील यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

या आंदोलनस्थळी शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी देखील केली. शिवसेना (ठाकरे गट) सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाली असून उद्धव ठाकरे यांनी देखील रविवारी औरंगाबाद दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेटली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आज आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद येथे उपोषण सुरू केले आहे. ”वेळ आली आहे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची… एक होऊन लढूया आपला हक्क मिळवून घेऊया…” असे आवाहन करणारे ट्विट देखील आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

45 mins ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

1 hour ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago