महाराष्ट्र

Amit Thackeray : मनसे शहराध्यक्षाचा मित्राकडून खून, अमित ठाकरे कुटुंबियांच्या भेटीला

राज्यात राजकीय वादंगात सगळेच पक्ष आपापल्या महत्त्वामुळे चांगलचे चर्चेत आलेले आहेत. यामध्ये मनसे या पक्षाला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या या वादात आपली पोळी भाजून घेण्याची नामी संधीच चालून आल्यामुळे मनसे आता शिंदे, भाजपला हात मिळवणी करणार असल्याच्या वावड्या रोज उठत आहेत. परंतु मनसेकडून अद्याप तशी कोणतीच अधिकृत भूमिका समोर न आल्यामुळे सारेच समीकरण न उलगडणारे आहे. दरम्यान यावेळी एका वेगळ्याच कारणावरून मनसे सध्या चर्चेत आली आहे. परभणी येथे मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा त्यांच्या मित्रानेच खून केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे वृत्त कळताच मनसे नेते अमित ठाकरे यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे परभणी दौरा केला. यावेळी त्यांनी हत्या झालेल्या मनसैनिकाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले आहे. काहीच दिवसांपूर्वी एका वादातून मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची त्यांच्या मित्रानेच हत्या केली होती. सदर वाद एका शुल्लक कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai Police : दाऊद गँगला मुंबई पोलिसांचा दणका! एकाच वेळी टोळीतील 5 जणांना अटक

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, हातात मशाल घेऊन घरे जाळू नका

Mumbai News : 28 लाखांचं सोनं, सीसीटीव्हीचा डीव्हीआर अन् पोलिसांना चकवा! मुंबईत बॉलिवूड स्टाईल चोरी

परभणी येथील शिवराम नगर येथे राहणारे मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्रासोबत रात्री बसले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक बोलत असताना वाद उफाळला. वादामागचे कारण शुल्लक होते परंतु बात हमरी तुमरीवर आल्यामुळे मित्राने पाटील यांच्या मानेवर चाकूने वार केले. अचानकपणे वार झाल्याने सचिन पाटील जागीच कोसळले. पाटील यांच्या खूनामुळे परभणी शहरात मात्र एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या घटनेची दखल घेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी तात्काळ परभणी गाठून सचिन पाटील यांच्या कुटुंबियांच्या घरी भेट दिली. भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन सुद्धा केले. यावेळी बोलताना त्यांच्या पाटील यांच्या मातोश्रींचे अश्रू अनावर झाले त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुलगा खूप कर्तबगार होता, दोन-अडीच वर्ष मोठमोठ्या लोकांचं काम बंद होतं, मात्र त्याने आम्हाला सांभाळलं, असे हात जोडून अमित ठाकरेंना सांगितलं. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले, हे खूप शॉकिंग होतं, मुलांचं भविष्य आहे, असे म्हणून सचिन यांच्या पत्नीला जॉब संदर्भात यावेळी सुचवले आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

10 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

11 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

12 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

13 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

13 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

13 hours ago