33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयAbdul Sattar : अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, हातात मशाल घेऊन घरे...

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, हातात मशाल घेऊन घरे जाळू नका

ठाकरे गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून धगधगत्या मशालीचे चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला असून आपल्याला काय घरांना आग लाावायची नाही आहे असा जोरदार हल्लाबोल केला आहे. 

सध्या राज्यात शिवसेना वि. शिवसेना वाद आता चांगलाच उफाळला असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या दोन्ही शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याची बतावणी वारंवार होत असल्यामुळे हा वाद येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकोपास जाऊ नये म्हणून आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह हे काढून घेतले आहे. यावर आता ठाकरे गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून धगधगत्या मशालीचे चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला असून आपल्याला काय घरांना आग लाावायची नाही आहे असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कृषी संदर्भातील सध्याची सरकारची भूमिका, वेगळे उपक्रम याविषयी बोलताना त्यांनी सध्या पक्षाच्या चिन्हावरून चालू असलेल्या वादंगावर सुद्धा भाष्य केले आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर नवीन पार्टी बनवायची आणि घराघरांत पर्यंत मशाल घेऊन जायची आपल्याला काय घरांना आग लाावायची नाही आहे असे म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : 28 लाखांचं सोनं, सीसीटीव्हीचा डीव्हीआर अन् पोलिसांना चकवा! मुंबईत बॉलिवूड स्टाईल चोरी

Australia Cricket : ऑस्ट्रेलियाला कॅप्टन मिळेना! मार्शने कर्णधारपद नाकारल्याची माहिती उघड

Amitabh Bachchan Birthday : ‘बीग बीं’च्या मनाचा मोठेपणा! चाहत्यांसोबत साजरा केला 80वा वाढदिवस

पुढे अब्दुल सत्तार म्हणतात, पहिले निवडलेले चिन्ह रद्द झाल्यामुळे आता नवीन चिन्हासाठी पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे, संध्याकाळ पर्यंत निवडणूक आयोग याबाबत निकाल देईलच पण आमच्या हक्काचे शिवसेना चिन्ह गोठवण्यात आले आहे असे म्हणून त्यांनी दुःख व्यक्त केले. चिन्ह हे फार महत्त्वाचे असते परंतु एकनाथ शिंदे साहेब असा आमचा चिन्ह आहे की या चिन्हामुळे गोरगरीब, सगळे सामान्य त्यांना आपला माणूस म्हणतात, आमचा मुख्यमंत्री म्हणतात असे म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक सुद्धा केले आहे.

सोन्याचा चमचा घेतलेले मुख्यमंत्री असतीलही परंतु स्वतःच्या नावाने पक्ष काढलाय तर बघू किती पुढे जातात असे म्हणून अब्दुल सत्तार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे ठाकरे गट वि. शिंदे गट यांची येत्या अंधेरी पोटनिवडणुकीत चांगली जुंपणार असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गट म्हणजेच शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना लोकांच्या किती पसंतीस पडते आणि त्याला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी