दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

टीम लय भारी

मुंबई :- सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. यानंतर पडळकरांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. यावेळी समर्थकांनी एकच छंद गोपीचंद अशी घोषणाबाजी दिली होती. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी एकच छंद तोंडावर पडला असे म्हणत पडळकरांना चिमटा काढला आहे (MLA Amol Mitkari has tweaked Padalkar saying that only one hobby fell on his face).

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणाले, “दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद, खिशात घेऊनी (सफरचंद), केला राष्ट्रवादीचा नाद, नारा देती “एकच छंद तोंडावर पडला……….. नाद करा पण आमचा कुठं, अशी कविता करत मिटकरींनी पडळकरांना चिमटा काढला आहे (By doing such a poem, Mitkari has tweaked Padalkar).

पडळकरांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीचा व्हिडिओ मिटकरींनी पोस्ट केला आहे. यात पडळकरांचे समर्थक कार्यालयावर दगडफेक करत आहे, कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दगडफेक करून जोर लावूनही कार्यालयाच्या काचाही फुटत नाहीत असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे, नाद करा पण आमचा कुठे, असे अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले आहेत (Make noise but where is ours, said Amol Mitkari in a tweet).

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड, पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे ट्विटद्वारे तक्रार

पवारांबाबत, पडळकर नेमकं काय म्हणाले?

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढे कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी जहरी टीका करत गोपीचंद पडळकरांनी पवारांची खिल्ली उडवली होती. ते पुढे म्हणाले, शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. कोंबड्याला वाटते मी आरवल्याशिवाय दिवस उजाडत नाही, असे कोंबडे दिल्लीत एकत्रित आले होते, असा घणाघात पडळकरांनी पवारांच्या दिल्ली बैठकीवरुन केला होता. शरद पवार जातीवाद करता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहेत अशा टीका पडळकरांनी केल्या होत्या.

अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर

‘हे खपवून घेणार नाही’, निलेश लंकेंचा थेट पडळकरांना इशारा

Maharashtra BJP Leader Says His Car Was Attacked With Stone In Solapur

पडळकरांच्या गाडीवर हल्ला

घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते. सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. यानंतर शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या वाहनातून घोंगडी बैठकीला आले होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेक केली होती. पडळकरांच्या गाडीवर भला मोठा दगड टाकला आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशा घोषणा देत तेथून त्याने पळ काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड

सोलापूर मध्ये गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर, सोलापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. ही दगड फेक गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी केली आहे. कार्यालयावर दगदफेक करतांना एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. सोलापूर मधला हा वाद आता पेटत असल्याचे दिसून येत आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

7 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

8 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

9 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago