राजकीय

‘ही कारवाईची सुरूवात आहे, यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत’ : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

मुंबई :- सचिन वाझे प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली होती. यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ही तर सुरूवात आहे, यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत (The list is long and all are on the radar, said Chandrakant Patil).

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाई ही तर सुरुवात आहे, यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कवडीमोल किंमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्यांची चौकशी तपास यंत्रणांच्या रडारवर आहे,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना केले (This statement was made by Chandrakant Patil while speaking in Pune on Friday).

प्रश्न विचारायचा असेल तर आधी मुख्यमंत्री करा, संभाजीराजे भडकले…

अशा राजकारणाला आम्ही भिक घालत नाही; नाना पाटोलेंचा भाजपाला टोला

राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे सहकारी साखरकारखाने तोट्यात दाखवून ते जप्त करायचे. नंतर त्यांचा लिलाव करायचा आणि दोनशे कोटीची संपत्ती पंधरा कोटीत खरेदी करायची. त्यावर पुन्हा तीनशे कोटीचे कर्ज घ्यायचे अशा पद्धतीचा गैरव्यवहार राज्यात झाला आहे. अशा सर्व २४ साखर कारखान्यांची खरेदी सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत.

चंद्रकांत पाटील आणि अजित पवार

सर्व पक्षीय चोरांचा शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा

Ajit Pawar hits back at Chandrakant Patil’s demand for CBI inquiry; asks ‘What action was taken when he was accused of corruption?’

यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांची शेकडो कोटींची संपत्ती कवडीमोलाने हडपण्याच्या प्रकाराची चौकशी होण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. राजकीय दबावासाठी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी नाकारला. “कारवाईबद्दल तक्रार करणाऱ्यांनी आधी काही गैरव्यवहार झाला हे तरी मान्य करावे. सध्याच्या काळात चूक करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे परिणाम भोगावे लागतील (Nowadays anyone who makes a mistake will suffer the consequences).

Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

5 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

5 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

8 hours ago