महाराष्ट्र

AwhadVsBJP : ‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार,  मुलीवर बलात्कार करू’

टीम लय भारी

मुंबई : सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या ट्रोलर्सनी ‘जितेंद्र आव्हाड तुझा नरेंद्र दाभोळकर होणार’ ( AwhadVsBJP ) अशी उघड धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे, ही धमकी कालच्या मारहाण प्रकरणाच्या अगोदरच दिली आहे. मारहाण झाल्यानंतर आता आव्हाड यांच्या मुलीवर बलात्कार करण्याचीही ताजी धमकी देण्यात आली आहे.

आव्हाडांचा दाभोळकर करण्याची धमकी कैलासराणा गणेश सुर्यवंशी याने फेसबुकवर दिली आहे. तर आव्हाड यांच्या नावानेच खोटे अकाऊंट उघडून त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी अज्ञाताने दिली आहे.

नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या सनातनी हिंदुत्ववाद्यांनी केली होती. या दोन्ही दिवंगत मान्यवरांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला अनुरूप सामाजिक कार्य केले. शिवरायांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला होता. अंधश्रद्धेत जखडलेल्या अठरा पगड जातीच्या लोकांना शहाणे करण्यासाठी दाभोलकरांनी आयुष्य वेचले.

विकृत मनोवृत्तीचे टोलर्स आव्हाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत

लोकांना शहाणे करणे, धर्मभोळेपणा – अंधश्रद्धेला कडाडून विरोध करणे असे कार्य दाभोलकर व पानसरे यांनी केले होते. दाभोलकर व पानसरे यांचे कार्य काही धर्मांध हिंदुत्ववाद्यांना पचनी पडले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील या दोन मान्यवरांची हत्या सनातन्यांनी केली होती.

जितेंद्र आव्हाड ( AwhadVsBJP ) हे सुद्धा दाभोलकर यांच्याप्रमाणेच हिंदु धर्मातील भंपकपणावर सतत टीका करीत असतात. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार सांगत असतात. दाभोलकर व पानसरे यांचे विचार सनातन्यांना पटले नव्हते. आव्हाडांचेही ( AwhadVsBJP ) विचार आता सनातन्यांना खटकू लागले आहेत. त्यामुळे दाभोळकर यांच्या प्रमाणेच आव्हाडांचीही ( AwhadVsBJP ) हत्या करण्याचा कट शिजवला जातोय की काय अशी शंका या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झाली आहे.

शाहु, फुले, आंबेडकरांची भूमिका मांडणाऱ्या सामाजिक – राजकीय कार्यकर्त्यांना धर्मांध सनातनी सोशल मीडियावर गलिच्छ शब्दांत ट्रोल करीत असतात. भाजप सरकारच्या ( AwhadVsBJP ) कार्यकाळात तर या विकृतांनी कहरच माजवला आहे. अशा स्थितीत पोलीस यंत्रणा मात्र काहीच कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विकृत धर्मांधाना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारण्याची गरज असल्याच्या भावना आता जनमाणसांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

AwhadVsBJP : ‘ज्याला मारलं, तो यापूर्वीच गजाआड हवा होता’

Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’

Dr. Ambedkar : डॉ. आंबेडकर जयंतीचा ‘इव्हेन्ट’ करू नका; विरोधक आपल्या बदनामीसाठी टपलेत’

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांना कुणी मारले ?

तुषार खरात

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

3 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

3 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

4 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

4 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

4 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

4 days ago