महाराष्ट्र

बागेश्वर महाराजावर शिंदे गटाचा संताप

बागेश्वर धामचा पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Maharaj ) महाराजाने आपल्या कुपमंडूक बुद्धीने जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीबद्दल एका कार्यक्रमात अतिशय आक्षेपार्ह विधान केल्यानंतर धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे. जगतगुरू संत तुकोबारायांबद्दल (Sant Tukaram) केलेल्या विधानावर आता शिंदे गट (Eknath Shinde group) देखील आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाशी संलग्न असलेल्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष हभप अक्षय महाराज भोसले यांनी धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार प्रहार करत तुकाराम महाराजांचा अपमान कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Bageshwar Maharaj was condemned by the Eknath Shinde group after he made defamatory statements about Sant Tukaram)

गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र प्रसाद याच्या अनेक चमत्काराच्या चर्चांना ऊत आला आहे. नागपूरात कथावाचन सप्ताहात त्याच्या चमत्काराला अंनिसचे शाम मानव यांनी आव्हान दिल्यानंतर त्याने महाराष्ट्रातून पलायन केले. त्यानंतर अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या त्याच्या चमत्काराच्या भोंदूगिरीच्या चर्चा सुरु असतानाच हा बाबा संत तुकाराम महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधाने करत बरळत सुटला आहे.

तुकाराम महाराजांनी संपूर्ण जीवन कर्मकांडाला विरोध करत वारकरी सांप्रदायाचे कळस झाले. कर्मठ सनातन्यांच्या विरोधात विद्राह करत तुकाराम महाराजांनी सर्वसामान्यांना भक्तीसांप्रदायातून इश्वराचे व्दार खुले केले. मात्र आज देखील तुकोबायारांयांची बदनामी हे कर्मठ करत आहेत. बागेश्वर महाराजाने देखील तुकोबायांबद्दल अशीच बदनामी कारक मुक्ताफळे उधळली असून त्याच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
त्याच्या या वक्तव्यानंतर हभप अक्षय महाराज भोसले यांनी त्याचा निषेध व्यक्त केला असून त्यांनी म्हटले आहे की, संत तुकाराम महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. समाजाला अंधश्रध्देपासून दूर लोटून भक्तीच्या मार्गावर आणणारे संत म्हणजे श्री तुकाबोराय. वारकरी सांप्रदाय कोणत्याही जादूटोणा अथवा अंधश्रद्धा याचं समर्थन करत नाही. तीव्र निषेध. नेणती कांहीं टाणाटोणा I नामस्मरणावाचूणी I

हे सुद्धा वाचा

तुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्प का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा!

संत श्रीतुकाराममहाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. आईसाहेब जिजाई यांचे इतकी थोर पतिव्रता पाहता येईन क्वचितच दुर्मिळ. आयुष्यभर आपल्या पतींनी भोजन केल्याशिवाय ज्या माऊलीने भोजन केलं नाही. त्यांच्याविषयी बोलताना संबंधितांनी मर्यादा बाळगळी पाहिजे. ज्यांना देवप्रथम भेट देतो त्या संतवर्य जिजाई आईसाहेबांचा अधिकार खूप मोठा होता. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान करणे हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मग समोरचा व्यक्ती कोणी असो धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे अक्षय महाराज भोसले यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

22 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago