33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeटॉप न्यूजपळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

बंडातात्या कराडकर; तुषार भोसले यांच्या तोंडाला कुलूप; भोंदू सनातनी बरळल्यानंतर कुठल्या बिळात लपून बसले? वारकरी संप्रदायाचा संतप्त सवाल ✪✪ आज जर तुकोबाराय हयात असते तर भोंदू बागेश्वरला पायताणाने बडवला असता.

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे सध्या जाणवत आहे. त्यामुळेच भ्रमिष्ट बरळणाऱ्या या भोंदूने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती केली आहे. (Sant Tukaram Maharaj Defamation) तुकोबारायांची प्रवचनातून बदनामी करणाऱ्या भोंदू बागेश्वरचा राज्यात सर्वत्र जाहीर निषेध होत आहे. दुसरीकडे, वारकरी संप्रदाय आणि तुकोबारायांच्या नावाने मिरविणारे बंडातात्या कराडकर आणि तुषार भोसले यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. भोंदू सनातनी बागेश्वर हा भ्रमिष्टासारखा बरळल्यानंतर वारकरी संप्रदायाचे स्वयंघोषित ठेकेदार कुठल्या बिळात लपून बसले? असा संतप्त सवाल राज्यातील वारकरी करू लागले आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची प्रवचनातून बदनामी करणाऱ्या भोंदू बागेश्वरविरोधात राज्यात वातावरण तापले आहे. सोशल मीडियातून त्याला यथेच्छ भोसडले जात आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम सरकारचा पीठाधीश्‍वर म्हणविणारा हा धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज अलीकडेच नागपूरमधून बिदागी घेऊन पळून गेला होता. त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. अंधश्रद्धा पसरवण्याचे काम हा भोंदू बाबा करतो. एबीपी वाहिनीच्या एका बावळट पत्रकारला हाताशी धरून या धीरेंद्रने स्वत:च्या चमत्कारी शक्तीचा ढोल पिटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनेकांनी सोशल मीडियावर खुले आव्हान देत त्यांच्या दाव्यांची पोलखोल केली.

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

तुका म्हणे गाढव लेका!
जेथे भेटेल तेथे ठोका!

आज जर तुकोबाराय हयात असते तर भोंदू बागेश्वरला पायताणाने बडवला असता.
अशा भोंदू लोकांसाठीच जणू तुकाराम महाराज कित्येक वर्षांपूर्वी लिहून गेले –

तुका म्हणे ऐशा नरा!
मोजूनी माराव्या पैजरा!
तुका म्हणे गाढव लेका!
जेथे भेटेल तेथे ठोका!
नक्की काय अजेंडा आहे या सनातनी लोकांचा?   

आता या सनातनी धीरेंद्र बुवाने मुद्दाम महाराष्ट्राला कर्मकांडमुक्त करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची बदनामी केली आहे. यापूर्वीही संघाच्या काही मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा, अवमान करण्याचा नालायकपणा केला आहे. आता संत तुकाराम महाराजांबद्दल भोंदू बुवा बागेश्वर सारखे लोक बोलतात, याने सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपण हे थांबवणार आहोत की नाही? कुठे तरी हे थांबले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. नक्की काय अजेंडा आहे या सनातनी लोकांचा? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा 25-26 वर्षांचा भोंदू बाबा, याला संत तुकारामांचे किती अभंग पाठ असतील? ते त्यालाच माहीत; पण बागेश्वर म्हणतो, तुकोबारायांना बायको मारायची म्हणून ते देव देव करायला लागले. कुठल्या पुस्तकात असे लिहिले आहे ? याचे उत्तर या हरामखोर बुवा आणि त्याचे समर्थन करणाऱ्या त्याच्या भक्त मंडळीनी द्यावे. संत तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी यांच्याबद्दल अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या पळपुट्या बागेश्वराचा जाहीर निषेध, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

हे सुद्धा वाचा  :

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे’ काम पाहा …

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

बंडातात्यांच्या विधानाने महिलांच्या स्वाभिमानाला धक्का , रुपाली चाकणकर

Sant Tukaram Maharaj Defamation, Dhirendra Shastri Gone Mad, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, बागेश्वर, Bageshwar Dham पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा-नालस्ती

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी