महाराष्ट्र

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

थोर क्रांतिकारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. पण त्यांच्या निधनानंतर या वाड्याची रया गेली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. भिडे वाड्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात दाखल असणारा खटला पुणे महापालिकेने जिंकला. यामुळे येथे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिडे वाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पुणे महापालिकेने २१ फेब्रुवारी २००६ रोजी मान्यता दिली होती. वाड्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद देखील करण्यात आली होती. याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९-२० च्या अंदाजपत्रकातही सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

याखेरीज याबाबत विविध स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. याला आता सर्वोच्च  न्यायालयाच्या आदेशानंतर यश मिळाले आहे. सावित्रीमाई या खऱ्या अर्थाने शिक्षणाची देवी आहेत. नवरात्रौत्सवात हा निर्णय आला हा योगायोग सुखावणारा आहे. राज्य शासनाने आता हा विषय ‘मोस्ट प्रायोरिटी’वर घेऊन हा विषय मार्गी लावावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी  प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. कारण, भिडे वाड्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच या शाळेच्या ठिकाणी स्मारक उभारलं जाईल. स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी त्या जागेचे मूळ मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी अलिकडेच चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बँकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बँकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले होते.

 

हे सुद्धा वाचा 

महाराष्ट्र की महा’ड्रगनिर्मितीराष्ट्र’? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना

गर्भपाताबद्दल काय आहे ‘सर्वोच्च’ निकाल?

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! ‘हा’ साकारतोय गडकरींची प्रमुख भुमिका

मुलींसाठी देशातली पहिली शाळा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. परंतु, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अडकले होते. आता या स्मारकासमोरचा न्यायालयीन पेच सुटला असून लवकरच भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारले जाईल.

 

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago