महाराष्ट्र

Bhima Koregaon Case : आनंद तेलतूंबडे यांना जामीन मंजूर; पण काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार

भीमा कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरणी सध्या तळोजा कारागृहात असलेले प्राध्यपक आनंद तेलतुबंडे यांना आज (18 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांनी जामीनासाठी केलेली याचिका योग्य असल्याचे सांगत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला जामीन मंजूर केला आहे. मात्र तेलतूंबडे यांच्या जामीनावर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामीनाच्या निकालासाठी आठवडाभराची स्थगिती दिल्यामुळे तेलतुंबडे यांना आणखी काही दिवस तुरूंगात रहावे लागणार आहे.

भीमा-कोरेगाव लढाईला 1 जानेवारी 2020 रोजी 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठा हिसांचार होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. तसेच 31 डिसेंबर 2020 रोजी पूण्यात शनिवारवाड्या समोर एल्गार परिषदेचे आयोजन केले होते, या प्रकरणात प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना एप्रिल 2020 मध्ये तेलतुंबडेंना ‘एनआयए’ने सध्या विशेष न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते आणि त्यांनी कोणतंही भडकाऊ भाषणही केलं नव्हतं, असं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. आज या याचिकेवर सुनावणी होऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयामध्ये आनंद तेलतुंबडे यांच्यावतीने अॅड. मिहिर देसाई यांनी बाजू मांडली, तर मांडली तर एनआयएकडून वरिष्ठ सरकारी वकिल संदेश पाटील यांनी बाजू मांडली.
हे सुद्धा वाचा :

Mumbai Local Megablock: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून 27 तासांचा मेगाब्लॉक

Mahavikas Aghadi : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता

Recruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय

एनआयएने आनंद तेलतुंबडे यांच्यावर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्याचे कलम १३, १६ व १८ कलमांतर्गत दाखल केलेले गुन्हे सिद्ध होत नसल्याचे यावेळी न्यायालयाने म्हटले. केवळ कलम ३८ व ३९ अंतर्गत गुन्हे सिद्ध होतात, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचा बॉंड आणि दोन हमीदार सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने तेलतूंबडे यांना जामीन मंजूर केला. यावेळी एनआयएला जामीनाविरोधात सर्वौच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाने एक आठवड्याची मुदत दिली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

10 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

11 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

11 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

12 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

12 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

14 hours ago