महाराष्ट्र

Mumbai Local Megablock: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; उद्यापासून 27 तासांचा मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी रेल्वेबाबत अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वांत जुना पूल म्हणून ओळखला जाणारा कर्नाक पूल पाडण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि भायखळा स्थानकांदरम्यान शनिवार 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहेत. मोहम्मद अली रोडवरील पी डी’ मेलो रोडला कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात येणार असून सीएसएमटी-मशीद बंदर या स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर 27 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

या मेगाब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्या तसेच लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. हा ब्लॉक 27 तासांचा असला तरी सीएसएमटी ते भायखळा दरम्यानच्या मुख्य मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक किमान 20 तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी (ता. 17 नोव्हेंबर) अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कर्नाक उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. या 27 तासांत मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील (छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि वडाळा दरम्यान हार्बर मार्ग) मुंबई लोकल सेवेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती देताना सांगितले की, कर्नाक पुलाचे काम करण्यासाठी आम्ही 27 तासांचा ब्लॉक घेत आहोत. 19 नोव्हेंबरपासून रात्री 11 ते 21 नोव्हेंबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर केला गेला आहे.

हे सुध्दा वाचा

10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Video : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’!

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

मुख्य मार्गावरील सेवा या मार्गावरून असतील
ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला येथून सुरु होतील आणि या स्थानकावरती थांबतील. मुख्य मार्गावरील उड्डाणपूल तोडण्याचे काम पूर्ण करण्याचा आणि 4 पर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवार ( ता. 20 नोव्हेंबर) मध्य रेल्वे भायखळा आणि ठाणे, कल्याण आणि कर्जत दरम्यान मुख्य मार्गावरील सेवा चालवणार आहे.

हार्बर मार्गावरील सेवा या स्थानकावरून सुरू राहणार
20 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोड स्थानकापासून सुरु होतील आणि या स्थानकावरती थांबतील. प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हार्बर मार्गावर वडाळा आणि पनवेल तसेच वडाळा आणि गोरेगाव दरम्यान ही सेवा मर्यादितरित्या उपलब्ध असेल.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 mins ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

1 hour ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

2 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

3 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

3 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

4 hours ago