महाराष्ट्र

मोदी सरकारच्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपाची मोहीम

टीम लय भारी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आहे. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सुरू केला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत दिली. (BJP’s campaign to work of Modi government)

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या आठ वर्षाच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. घटनेचे ३७० वे कलम रद्द करणे किंवा अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर उभारणे असे महत्त्वाचे विषय त्यांनी मार्गी लावले. त्यांनी गरीब कल्याणासाठी मिशन म्हणून काम केले. देशात ९ कोटी गॅस कनेक्शन देणे, दोन कोटी घरांना वीज कनेक्शन देणे, सहा लाख गावे हागणदारीमुक्त करणे, सामान्य लोकांची ४२ कोटी नवी बँक खाती उघडणे असे सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याची अनेक कामे मोदी यांनी यशस्वीरित्या केली. त्यांचे हे काम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदेश भाजपाने मोहीम सुरू केली आहे.

ते म्हणाले की,  मोदी यांनी ३१ मे रोजी देशभरातील लाभार्थींना व्हर्चुअल पद्धतीने संबोधित केले. त्यामध्ये राज्यातील ५७२ ठिकाणाहून लोक सहभागी झाले. भाजपाच्या किसान मोर्चाने १ मे रोजी राज्यातील २९५ ठिकाणी शिवार सभा आयोजित करून मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. महिला मोर्चातर्फे आज राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुसूचित जाती मोर्चातर्फे बाबासाहेब विश्वास रॅली काढण्यात येणार आहे. अनुसूचित जमाती मोर्चातर्फे बिरसा मुंडा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा मोर्चातर्फे राज्यात ठिकठिकाणी विकासतीर्थ रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती देणारी पत्रके लोकांना देणार आहेत.

जीएसटीच्या भरपाईच्या थकबाकीवरून महाविकास आघाडी सरकार कांगावा करत आहे. याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, असे आवाहन आपण केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना करणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पारडे जड

 चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आमचे आवाहन आहे.

भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम

श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण दि. १४ जून रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी पन्नास हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.  पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी वेगात चालू असल्याचे त्यांनी सांगितले.


हे सुद्धा वाचा :

जीएसटी’चा संपूर्ण परतावा मिळाल्याने पेट्रोल डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा, भाजपची मागणी

भाजप नेते मोहित कंबोजविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गंगेत प्रेतं वाहून गेली तसे हे भाजप सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल : संजय राऊत

भाजपचा धनगरांवर वरवंटा, मराठवाड्यात अन्याय

 

 

Pratiksha Pawar

Recent Posts

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

3 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

3 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

3 hours ago

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

4 hours ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

5 hours ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

5 hours ago