महाराष्ट्र

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’सारखी योजना लागू होणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी जशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे तशीच योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी (OBC students) देखील सुरू करण्यात येणार आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेप्रमाणे एक योजना लागू करणार येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतीगृहांसाठी जागा निश्चित केल्या असून लवकरच वसतीगृहे सुरू करण्यात येणार असून याचा फायदा 31 जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना राबवून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, राहण्याचा आणि जेवणाचा खर्च विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर पाठवण्यात येणार आहे. तसेच ओबीसीविद्यार्थ्यांसाठी जी वसतीगृहे असणार आहेत ती खासगी संस्थांऐवजी स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत. अशी योजना समाजकल्याण खात्यामार्फत सुरू असून खासगी व्यक्तींकडे वसतीगृह चलवण्याची जबाबदारी देणार नसल्याचे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

त्यांची नजर वाईट, यापुढे आरएसएसने सावध राहण्याची गरज : उद्धव ठाकरे

मोगलाई निलंबन : शिंदे सरकारानु, आसं कुटं आसतंय व्हय? – तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचा सवाल !

पोस्ट खात्यात एकाच दिवसात 5000 ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांना मंजूरी; बदल्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

याविषयावर विधानसभेत चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वाधारसारखी योजना राबविली जात होती मात्र या सरकारने ही योजना बंद पाडल्याचा आरोप केला. यावेळी भुजबळ यांचे आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावताना अशी योजना मविआ सरकारच्या काळात लागू झाली नव्हती, त्यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा, ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जशी पीएचडीसाठी फेलोशिप देण्यात येते तशीच आता आदिवासी विद्यार्थ्यांना देखील देण्यात येणार आहे.

 

प्रदीप माळी

Recent Posts

नेहरू-आंबेडकरांचे संबंध परस्पर आदराचे अन् तणावाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात दोन पातळ्यांवर लढा देत होते(The Nehru-Ambedkar relationship was one of…

46 mins ago

Teacher’s Election | ज. मो. अभ्याकरांंनी शिक्षकांचं वाटोळं केलं, शिवसेनेचा चुकीचा उमेदवार

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली आहे असे असले तरीही शिक्षक व पदवीधर निवडणूकांची धामधुम…

2 hours ago

मनुस्मृती वाईट, पण त्यातील श्लोक चांगले | शिक्षण मंत्री Deepak Kesarkar यांच अजब तर्कट

सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर इयत्ता १०वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

22 hours ago

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विद्यार्थी पालकांना मोलाचा सल्ला

आज इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला.सदर व्हिडीओ मध्ये राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर परीक्षेत…

22 hours ago

अजित पवार म्हणाले, सुनील टिंगरे यांचीही चौकशी होणार, कारवाई सुद्धा करू

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago

शरद पवारांवर नाराज नाही, पण सुप्रिया सुळे नोकरासारख्या वागवतात

राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचेराष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा…

23 hours ago